Maharashtra kharif Sowing: यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरात खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. (Kharif Sowing) जुलै महिन्यातही पहिले 15 दिवस विस्कळीत स्वरूपाचा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं होतं. मात्र, गेल्या पाच ते सात दिवसांपासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यभरातील खरीप पेरण्यांना वेग आला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात ऊस पीक वगळून 74% खरीप पेरण्या झाल्या आहेत. कोणत्या विभागात किती टक्के पीकपेरा झाला, पाहूयात..
राज्यभरात 1 जून ते 20 जून या कालावधीत सरासरी 421 मिमी पाऊस झाला. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत पीक पेऱ्याचा आढावा घेण्यात आला होता. 20 जुलै अखेर राज्यातील 144.36 लाख हेक्टर सरासरी खरीपक्षेत्रापैकी 106. 79 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या झाल्या आहेत. यंदा 74% खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून गेल्यावर्षी याच तारखेला ही आकडेवारी 88 टक्क्यांवर होती.
कोणत्या विभागात किती पीकपेरा ?
कोकण विभाग - 15%नाशिक विभाग -78%पुणे विभाग - 61%कोल्हापूर विभाग - 63%छत्रपती संभाजीनगर विभाग - 79%लातूर विभाग -77%अमरावती विभाग -89%नागपूर विभाग -61%
सोयबीन लागवड किती?
छत्रपती संभाजीनगर विभागात, छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यातील मिळून 113% सोयाबीन पेरणी झाली आहे. तर लातूर धाराशिवनांदेडपरभणी आणि हिंगोली जिल्ह्यात 87% सोयाबीनचा पेरा झाला आहे.
अमरावती विभागातील, बुलढाणाअकोला वाशिम अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याचा मिळून 88% सोयाबीन पेरा झाला असून वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात 70 टक्के सोयाबीन पेरण्या झाल्या आहेत.
तूर, मका पेरणी कुठवर?
नाशिक विभागात 121 टक्के तुरीची पेरणी झाली आहे. पुणे विभागात 62% शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली असून कोल्हापुरात 83 % तर छत्रपती संभाजी नगर विभागात 86% तुरीचा पेरा झाला आहे. लातूर विभागात 57% तूर पेरणी झाली असून अमरावती विभागात 91% व नागपूर विभागात 78% तुरीची पेरणी झाली आहे.
नाशिक विभागात सर्वाधिक मका पेरणी झाली असून 128 टक्के मका लागवड झालीय.पुणे विभागात 88% तर कोल्हापूर विभागात 100% मक्याचा पेरा झाला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागात 94% मक्याची पेरणी झाली असून लातूर विभागात 42 टक्के, अमरावती 142% तर नागपूर विभागात 85% लागवड झाली आहे.
