Karad Satara Latest News : जिगरबाज बाप काय असतो, याचा प्रत्यय खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका गावात आलाय. बिबट्याने उचलून नेलेल्या आपल्या लेकराला वाचवण्यासाठी बापाने केलेला संघर्ष सध्या चर्चेचा विषय आहे. पाच फुटावरुन उडी मारुन बिबट्याने मुलाला नेलं होतं. पण जिगरबाज बापाने बिबट्याला हरवत आपल्या मुलाचा जीव वाचवला आहे. या जिगरबाज बापाचं सध्या कौतुक होत आहे.
बापाच्या धाडसापुढे बिबट्याही हरला, चिमुकल्याला मिळाला पुनर्जन्म, शेतात काय घडले होतं?
शेतात तरकारी लावली होती. दिवसभर शेतातली कामे केल्यानंतर शेतातली वांगी, शेंगा घेऊन शेतकरी दुसऱ्या दिवशी बाजारात जाणार होता. लगबगीने सगळं शेतातलं काम संपवलं होतं. शेतकऱ्यासोबत असलेला मुलगा गडबडीने घरी जायच्या तयारीत होता. बाबा भूक लागली, असं पोरगा बापाला सांगत होतं. थांब आता घरी गेल्यावर जेवण करूयात, असं म्हणून शेतकऱ्यांन पोराची समजूत काढली. शेतकऱ्याने शेतातलं काम आवरते घेतले. एका हातात खूरपं आणि एका हातात फावडं, शेतकऱ्याच्या काखेतील पिशवीत असणारी कैची खाली पडली. शेतकऱ्यानं पोराला उचलायला सांगितली. त्याच वेळेला शेताच्या बांधावर झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक उडी मारत पोराचं मानगुट पकडलं....
बापाला काही समजायच्या आत बिबट्याने पोराला ओडत नेहण्यास सुरवात केली. शेतकरी बापाला काहीच सुधरेना. बिबट्याने पोराला पकडल्याचं पाहिल्यावर शेतकऱ्यानं हातातलं सगळं सामान खाली टाकलं. बिबट्याच्या दिशेने छलांग मारली. पोराचा पाय हातात आला. पण कशाचं काय बिबट्यान हिसका देऊन पोराला फरपटत शेताच्या कुंपणापर्यंत नेहलं. बापाचा जीव कासावीस झाला होता. बाप मोठ्याने ओरडत बिबट्याच्या माघे पळत सुटला. राज राज म्हणत बिबट्याचा पाठलाग करत बांधावर पोहचला. अर्थातच त्या बिबट्याचा वेग बापानं धरला होता. कुंपणापर्यंत जाईपर्यंत पुन्हा एकदा शेतकऱ्याने आपल्या पोराला घट्ट मिठी मारण्यासाठी छलांग मारली. मात्र फक्त पाय त्याच्या हातात आला. यावेळीही बिबट्याने शेतकऱ्याला झटका देऊन त्याने पुन्हा पाच फूट कुंपणावरून जाण्यासाठी मोठी उडी मारली. दुसरीकडे शेतकऱ्याने तशीच छलांग मारून पोराला पकडण्याचा प्रयत्न केला. पाय हातात आला. बिबट्याची उडी कमी झाली आणि बिबट्या तारेवर गेला. बिबट्याला कुंपनाची तार आडवी आली होती.
शेतकऱ्याने दाबून धरलेला पाय आणि तारेचा अडथळा यामुळे बिबट्याच्या तोंडातून राज अलगद बाहेर पडला. बापाने पोराला उचलून आपल्या कवेत घेतलं. मानेतून होणारा रक्तस्त्राव पाहून तो गहिवरला. डोक्याला बांधलेला टॉवेल काढून त्याने त्याच्या रक्त येणाऱ्या ठिकाणी दाबून धरले. पोराला घेऊन कसाबसा तो रस्त्यावर आला. तेवढ्यात एक वाहन तेथून जाताना दिसलं आणि त्याने वाहनाला थांबवले, आणि पोराला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं.
पाच फुटावरुन उडी मारुन बिबट्याने मुलाला नेलं, जिगरबाज बापाने बिबट्याला हरवलं