Jalgaon News : इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने (Student) मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) उपस्थिती असलेल्या एका कार्यक्रमात इंग्रजीत भाषण केल्याचं पहायला मिळालं. या मुलीचं इंग्रजीतल भाषण (English Speech) पाहून मंत्री गुलाबराव पाटील हे सुध्दा अवाक् झाल्याचं पहायला मिळालं. दुहीता संदीप भदाणे असं इंग्रजीत भाषण करणाऱ्या मुलीचं नाव आहे. मंत्री गुलाबराव पाटील मुख्यमंत्री व्हावे अशा शुभेच्छा ही तिने यावेळी दिल्याने तिचे भाषण चर्चेचा विषय बनले आहे


मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील बिलखेडा येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन तसेच उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर बिलखेडा गावातीलच दुहीता भदाणे या आठवीच्या मुलीने न अडखळता फाडफाड इंग्रजीत मनोगत व्यक्त केलं. या मनोगतात तिने गावात ज्या विकासकामांचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन तसेच उद्घाटन झाले, त्या विकासकामांबद्दल माहिती दिली. या पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालय, यासह इतर कार्यक्रमांची माहिती तिनं दिली, तसेच याबददल तिने मंत्री गुलाबराव पाटील यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले, तसेच मंत्री गुलाबराव पाटील हे भविष्यात मुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त करत त्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांना दुहिता हिने शुभेच्छा सुध्दा दिल्या. 


दुहिता भदाणे या नववीच्या मुलीच्या इंग्रजीतील भाषणाने मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा चांगलेच प्रभावित झाल्यांच पहायला मिळालं. मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुहिता हिला व्यासपीठावर बोलवून पुष्पगुच्छ देवून तिचा सत्कार करत कौतुक केलं. तसेच मनोगतातही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुहिता हिच कौतुक करत, बिलखेडा सारख्या एखाद्या छोटयाश्या खेड्यातल्या मुली हुशार असल्याने ही गावासाठी अभिमानाची बाब बाब आहे. मुली सर्वच ठिकाणी पुढे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावं, या दुहिताने व्यक्त केलेल्या अपेक्षेबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता, एकनाथ शिंदे हे आणखीनच मोठे व्हावे, माझाी मुख्यमंत्रीपदाची कुठलीही इच्छा नसून मी आहे, त्यातच समाधानी असल्याचे मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.






मुख्यमंत्रीपदासाठी मराठा चेहरा 


जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बिलखेडा येथील कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी महत्वाचं विधान केले आहे. ते म्हणाले कि, गद्दारी केली अशी आमच्यावर टीका होते, मात्र गद्दारी का केली याचे कारण गुलाबराव पाटील यांनी दिले. उद्धव  ठाकरे यांना बोललो होतो की  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारखा मराठा चेहरा, आपल्यापासून लांब जाता कामा नये, आपण त्यांना बोलवले पाहिजे, मात्र या दरम्यान उठाव केला, आम्ही मराठा चेहऱ्याच्या मागे उभे राहिलो, हे बिनधास्तपणे सांगतोय, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.