HSC Time Table :  दहावीनंतर बारावीच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. शिक्षण मंडळाकडून मंगळवारी याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे चार मार्च पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. तर 15 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरु होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाने याआधीच परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानुसार, बारावीच्या लेखी परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल यादरम्यान होतील, याची घो,णा केली होती. तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान होईल, असं सांगण्यात आलं होतं. आता बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं सविस्तार वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पहायला मिळेल.


कसे असेल बारावी परीक्षेचा सविस्तर वेळापत्रक ?-
4 मार्च - इंग्रजी
5 मार्च - हिंदी
7 मार्च - मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ
8 मार्च - संस्कृत 
10 मार्च - फिजिक्स 
12 मार्च - केमिस्ट्री 
14 मार्च - माथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स 
17 मार्च - बायोलॉजी
19 मार्च - जियोलॉजी
9 मार्च-  ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
11 मार्च - सेक्रेटरीयल प्रॅक्टिस 
12 मार्च - राज्यशास्त्र 
12 मार्च - अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1
14 मार्च - अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 2
19 मार्च - अर्थशास्त्र 
21 मार्च - बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
23 मार्च - बँकिंग पेपर - 1
25 मार्च - बँकिंग पेपर - 2
26 मार्च - भूगोल
28 मार्च - इतिहास 
30 मार्च - समाजशास्त्र


दहावी बारवी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक - 
15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा 
19 मार्च : इंग्रजी 
21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय  (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
24 मार्च : गणित भाग - 1
26 मार्च : गणित भाग 2
28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 
1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
4 एप्रिल :  सामाजिक शास्त्र पेपर 2






दहावीचं वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा ....


बारावीचं वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा...