पुणे : बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC Board Re-examination) जाहीर झाला आहे. बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज, 28 ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना ‌www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. निकालात विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन देण्याच आले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. 


बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल 32.13 टक्के


बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची टक्केवारी 32.13 टक्के आहे. बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेला 68 हजार 909 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 22 हजार 144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान घेण्यात आली होती. बारावी बोर्डाची पुरवणी प्रात्यक्षिक परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्ट आणि लेखी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधी दरम्यान पार पडली. 


विभाग निहाय आकडेवारी



गुणपडताळणी, झेरॉक्स कॉपी आणि पुनर्मूल्यांकन


निकाल झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून गुणपडताळणीसाठी तसेच उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती आणि पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. यासाठी विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती आणि पुनर्मूल्यांकन यासाठीचे शुल्क ऑनलाईन पध्दतीनेच भरावं लागणार आहे.


गुणपडताळणीसाठी काय करावं लागेल?


गुण पडताळणीसाठी अर्ज करावयाची मुदत 29 ऑगस्ट 2023 पासून 07 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे गुणपडताळणीसाठी प्रति विषय 50 रुपये शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल.


उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स कॉपीच्या मागणीसाठी


उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी म्हणजे झेरॉक्स कॉपीच्या मागणीसाठी ई-मेल, वेबसाईट, घरपोच किंवा रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल. विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे 29 ऑगस्ट 2023 पासून 07 सप्टेंबर 2023 पर्यंत या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स कॉपीसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क भरावे लागेल, हे शुल्क ऑनलाईन पध्दतीने जमा करावे लागेल.


उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी


परीक्षार्थींना उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावा लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आधी उत्तरपत्रिकेची झेरॉक्स कॉपी घेणे अनिवार्य असेल, त्यानंतर झेरॉक्स कॉपी मिळाल्याच्या पुढील पाच दिवसांत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रत्येक विषय 300 रुपये शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI