Maharashtra HSC Result 2021 LIVE : बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 99.53 टक्के

Maharashtra Class 12, HSC Results Live Updates : राज्याचा बारावीचा निकाल अखेर आज, 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 4 वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Aug 2021 02:10 PM
बारावीच्या निकालाची विभागनिहाय टक्केवारी

विभागनिहाय टक्केवारी :



  • राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा : 99.81 टक्के

  • दुसऱ्या क्रमांकावर मुंबई विभाग : 99.79 टक्के

  • पुणे : 99.75 टक्के

  • कोल्हापूर : 99.67 टक्के

  • लातूर : 99.65 टक्के

  • नागपूर : 99.62 टक्के

  • नाशिक : 99.61 टक्के

  • अमरावती : 99.37 टक्के

  • औरंगाबाद : 99.34 टक्के

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 99.53 टक्के

बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा निकाल 99.53 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के, कला शाखेचा निकाल 99.83 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 99.91 टक्के लागला आहे.

दुपारी 4 वाजल्यानंतर बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येईल
3 ऑगस्ट रोजी बारावीचा निकाल, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

"महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.12वीचा निकाल उद्या दि.03 ऑगस्ट,2021 रोजी दु. 4 वा. जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!", असं ट्वीट करत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या निकालासंदर्भात घोषणा केली. 


आज बारावीचा निकाल, दुपारी 4 वाजता लाईव्ह होणार

आज बारावीचा निकाल. गेल्या अनेक दिवसांपासून निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलं होतं. आता पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे यामुळे दहावी प्रमाणेच बारावीच्या निकालालाही यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा झाला आहे. आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra HSC Result 2021 Date Time : आज बारावीचा निकाल. गेल्या अनेक दिवसांपासून निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलं होतं. आता पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे यामुळे दहावी प्रमाणेच बारावीच्या निकालालाही यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा झाला आहे. आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.  


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकषही ठरवले होते. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारेच आज बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे. 


बोर्डाच्या खालील अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच बारावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.


बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील



दरम्यान, बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावीचे निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी 30 :30 :40 असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%),अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.