मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एचएससी बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल यंदा 88.41 टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 92.36 टक्के इतका लागला आहे. तर 85.23 टक्के मुलं पास झाली आहेत. विद्यार्थ्यांना निकाल आज दुपारी 1 वा बोर्डाच्या www.mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच 94.85 टक्के इतका निकाल लागला आहे. तर सर्वात कमी नाशिक विभागाचा 86.13 टक्के इतका निकाल लागला आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरुन गुणपत्रिका प्रत डाऊनलोड करुन घेता येईल. गुणपत्रिकेची मूळ प्रत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वितरीत केली जाईल.
एकूण निकाल - 88.41 टक्के
मुलांची टक्केवारी-85.23 टक्के
मुलींची टक्केवारी - 92.36 टक्के
अपंग - 91.78 टक्के
कला - 78.93 टक्के
विज्ञान- 95.85 टक्के
वाणिज्य- 89.50 टक्के
व्यावसायिक अभ्यासक्रम- 82.18 टक्के
विभागवार निकाल -
कोकण- 94.85 टक्के
कोल्हापूर- 91 टक्के
औरंगाबाद- 88.74 टक्के
पुणे- 89.58 टक्के
नागपूर- 87.57 टक्के
लातूर- 88.31 टक्के
मुंबई- 87.44 टक्के
अमरावती- 88.08 टक्के
नाशिक- 86 .13 टक्के
बोर्डाने 5 वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल.
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.knowyourresult.com
www.hscresult.mkcl.org
आज वेबसाईटवर निकाल पाहता येईल तसंच गुणपत्रिका डाऊनलोडही करता येईल.
बारावीच्या निकालाची वैशिष्ट्य
पहिल्यांदाच उत्तरपत्रिका आणि पुरवणीच्या प्रत्येक पानावर बारकोड
परीक्षेच्या सूचना मराठीत
पुणे विभागासाठी पहिल्यांदाच ऑनलाईन हॉलतिकीट उपलब्ध
इंग्रजी विषयासाठी एबीसीडी प्रश्नसंच
प्रत्येक विषयाच्या परीक्षेच्या दरम्यान एक दिवसाचा खंड
नोव्हेंबर महिन्यातच वेळापत्रक जाहीर केल्यामुळे अभ्यासाला वेळ
परीक्षेच्या दहा मिनिटं आधी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती
परीक्षा कालावधीत दोन दोन समुपदेशक
भाषा विषयासाठी - 20 गुणांची तोंडी परीक्षा
विज्ञान आणि पर्यावरण विषयासाठी बहिस्थ परीक्षक
गैरमार्ग थांबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समिती
252 भरारी पथकं
संलग्न शाळांचे मुख्याध्यापक आणि लिपीकांची बैठक
प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटं दोन विद्यार्थी आणि पर्यवेक्षकांच्या स्वाक्षरीने वर्गात उघडली
बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वेबसाईटवर उपलब्ध होतील आणि त्याची प्रिंट आऊट घेता येईल.ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या विभागात बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचं वातावरण होतं.
मोबाईलवर निकाल कसा मिळवाल?
एसएमएस सेवेद्वारे मोबाईलवर बीएसएनएल धारकांना निकाल मिळवता येईल.
MHHSC <space> <seat no> हा मेसेज टाईप करुन 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.
14 लाख विद्यार्थी
राज्यात 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली. यामध्ये 8 लाख 34 हजार 134 विद्यार्थी तर 6 लाख 50 हजार 898 विद्यर्थिनी होत्या. विद्यार्थ्यांची शाखानिहाय आकडेवारी याप्रमाणे-
विज्ञान शाखा- 5 ,लाख 80 हजार 820 विद्यार्थी
कला- 4 लाख 79 हजार 863 विद्यार्थी
वाणिज्य- 3 लाख 66 हजार 756 विद्यार्थी
व्यावसायिक अभ्यासक्रम- 57 हजार 693 विद्यार्थी
Maharashtra HSC Result: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 88.41 टक्के
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 May 2018 11:13 AM (IST)
बारावीचा निकाल जाहीर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -