बारावीचा निकाल जाहीर: मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.  बोर्डाने पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल यंदा 88.41 टक्के लागला आहे.


मुलींचा निकाल 92.36 टक्के इतका लागला आहे. तर 85.23 टक्के मुलं पास झाली आहेत.

विद्यार्थ्यांना निकाल आज  दुपारी 1 वा बोर्डाच्या www.mahresult.nic.in  या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.

यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच 94.85 टक्के इतका निकाल  लागला आहे. तर सर्वात कमी नाशिक विभागाचा 86.13 टक्के इतका निकाल लागला आहे.

Maharashtra HSC Result: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 88.41 टक्के  

विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरुन गुणपत्रिका प्रत डाऊनलोड करुन घेता येईल. गुणपत्रिकेची मूळ प्रत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वितरीत केली जाईल.

बारावीच्या निकालाची वैशिष्ट्ये

पहिल्यांदाच उत्तरपत्रिका आणि पुरवणीच्या प्रत्येक पानावर बारकोड

परीक्षेच्या सूचना मराठीत

पुणे विभागासाठी पहिल्यांदाच ऑनलाईन हॉलतिकीट उपलब्ध

इंग्रजी विषयासाठी एबीसीडी प्रश्नसंच

प्रत्येक विषयाच्या परीक्षेच्या दरम्यान एक दिवसाचा खंड

नोव्हेंबर महिन्यातच वेळापत्रक जाहीर केल्यामुळे अभ्यासाला वेळ

परीक्षेच्या दहा मिनिटं आधी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती

परीक्षा कालावधीत दोन दोन समुपदेशक

भाषा विषयासाठी - 20 गुणांची तोंडी परीक्षा

विज्ञान आणि पर्यावरण विषयासाठी बहिस्थ परीक्षक

गैरमार्ग थांबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समिती

252 भरारी पथकं

संलग्न शाळांचे मुख्याध्यापक आणि लिपीकांची बैठक

प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटं दोन विद्यार्थी आणि पर्यवेक्षकांच्या स्वाक्षरीने वर्गात उघडली

संबंधित बातम्या 

Maharashtra HSC Result: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 88.41 टक्के   

 बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?