मुंबई : कोरोनाचा वाढता प्रभाव हा अनेक गोष्टींचा तुम्हाला नव्याने विचार करायला भाग पाडतोय. कोरोना कसा होतो! तो दुरुस्त कसा होतो? त्याच्यावरती उपचार काय आहेत? आधुनिक विज्ञान त्यासाठी काय करतय? ह्या करण्याच्या निमित्ताने बाधीत रूग्ण त्यांची संख्या मृत्यूचे प्रमाण त्याचा जागतिक पातळीवरती विश्लेषण सुरु आहे. आम्हीसुद्धा महाराष्ट्रातले बाधित रुग्ण त्यांच्या मृत्यूचे प्रमाण देशातले बाधित रुग्ण आणि त्यांच्या मृत्यूचे प्रमाण याचं विश्लेषण केलंय. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे बळी जाण्याचे प्रमाण वाढतं आहे. देशांच्या तुलनेमध्ये हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. महाराष्ट्रातल्या पहिल्या पंचवीस मृत्यूचं विश्लेषणही केले आहे. जागतिक पातळीवर कोरोना मूळ 5.40 टक्के लोकांचा बळी जातोय. अमेरिकेमध्ये हे प्रमाण 2.70 टक्के आहे. भारतामध्ये क्रमांक 2.50% पण महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण तब्बल पाच टक्के आहे.
आपण जरा वयोगटानुसार महाराष्ट्रातल्या बाधितांचे आणि मृत्यूची संख्या पाहीली तर एक ते दहा वर्ष वयोगटात मध्ये 12 पेशंट बाधित आहेत. मृत्यू एकही नाही 11 ते 20 वयोगटातील मध्ये 37 पेशंट बाधित आहेत. मृत्यू एकही नाही. 21 ते 30 या वयोगटातील मध्ये 94 पेशंट आहेत. मृत्यू एकही नाही. 31 ते 40 वयोगटातील मध्ये 102 पेशंट बाधित आहेत, त्यातल्या एका पेशंटचा मृत्यू झालाय. 40 ते 50 वयोगटातील मध्ये 109 पेशंट बाधीत त्यातल्या चार पेशंटचा मृत्यू झालाय. 51 ते 60 वयोगटातले ६० पेशंट बाधित त्यातल्या चार जणांचा मृत्यू झालाय. 61 ते 70 वयोगटातल्या 58 जणांना याची बाधा झाली आहे. त्यातले 12 जणांचा बळी गेला. 71 ते 80 या वयोगटातले 14 रुग्णालयातल्या तीन जणांचा मृत्यू झालाय. तर 81 ते 90 या वयोगटात मधले चार रुग्ण त्यातल्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचं वय आणि मृत्यूचे प्रमाण पाहता 51 ते 90 या वयोगटामध्ये आणि त्यातही 61 ते 70 या वयोगटात मध्ये मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक आहे असे दिसते. याशिवाय जवळपास महाराष्ट्रातल्या 490 रुग्णांचं जेव्हा विश्लेषण केलं. तेव्हा 349 पेशंटमध्ये कोणाची कोणतीही बाधा होत असल्याचे दिसून आले नाही. याचा अर्थ असा की जवळपास 71% पेशंटला ना कोणाची बाधा झाल्याचे दिसून आलेलं नाही आणि हे रुग्ण हे त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या रोगप्रतिकारक शक्ती मुळं स्वतः घरी कोणाला बळी पडत नसले तरी त्यांच्यापासून कोरोनाचा असा प्रसार वेगाने होऊ शकतो हे दिसून येते.
coronavirus | पुण्यात 24 तासात कोरोनाचे तीन बळी, मृतांची संख्या पाचवर
आठ रुग्णास कोविड 19 झाला होता, हे आपल्याला त्यांच्या मृत्यूनंतर तपासणीत लक्षात आले. त्यामुळे त्यांच्यावर कोविड 19 बाबत कसलाही इलाज केला गेला नव्हता. 46 मृत पावलेल्या केसेसचे विश्लेषण केले तर असे लक्षात येते कि सरासरी मृत्यूचे वय 61 वर्षे आहे. (सरासरी वय 67-68 असते. परंतु, दोन केसेस मध्ये 25 उत्तर प्रदेश व 38 बिहार असल्यामुळे 61 वर्षे आहे)
सरासरी आणि वय
- 70+ वय 10/46 या मध्ये 85 वर्षांचे देखील एक व्यक्ती आहे. (टीप : केरळ मध्ये 93 व 88 वर्षांचे जोडपे पूर्णपणे बरे देखील झाले आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवे)
- 70 पेक्षा जास्त वय असलेले 10/46
- 60 ते 70 वय असलेले 18/46
- 40 ते 60 वय असलेले 16/46
- 40 पेक्षा कमी वय असलेले 2/46
(25 वर्षे उत्तर प्रदेश केस मध्ये लिव्हर सोरोसिस व 38 वर्ष बिहार केसमध्ये किडनी विकार होता) - 36/46 पुरुष
- 10/46 स्त्री
- 46 फक्त 6 रुग्ण व्हेंटिलेटर वरती होते
EXPLAINER VIDEO | देशातले कोरोनाचे 50 आणि महाराष्ट्रातल्या 25 बळींचे अहवाल काय सांगतात? बातमीच्या पलीकडे