मुंबई : राज्याने कोरोना बाधित रुग्णांचा 20 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज 1165 नवीन रुग्णांची नोंद झाली. सलग चौथ्या दिवशी हजाराच्या घरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ही 20 हजार 228 इतकी झाली आहे. तर, एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद आज झाली. आज तब्बल 48 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे आज 330 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत राज्यभरात 3800 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 27 हजार 804 नमुन्यांपैकी 2 लाख 6 हजार 481 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 20 हजार 228 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 41 हजार 290 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 976 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


जादा शुल्क घेणाऱ्या शाळांवर कारवाई करणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा


आज राज्यात 48 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 779 झाली आहे.


राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)


मुंबई महानगरपालिका: 12,864 (489)
ठाणे: 110 (2)
ठाणे मनपा: 800 (8)
नवी मुंबई मनपा: 789 (4)
कल्याण डोंबिवली मनपा: 316 (3)
उल्हासनगर मनपा: 20
भिवंडी निजामपूर मनपा: 21 (2)
मीरा भाईंदर मनपा: 201 (2)
पालघर: 32 (2)
वसई विरार मनपा: 216 (9)
रायगड: 79 (1)
पनवेल मनपा: 137 (2)
ठाणे मंडळ एकूण: 15,595 (524)
नाशिक: 50
नाशिक मनपा: 73
मालेगाव मनपा: 472 (20)
अहमदनगर: 51 (2)
अहमदनगर मनपा: 9
धुळे: 8 (2)
धुळे मनपा: 42 (1)
जळगाव: 111 (12)
जळगाव मनपा: 22 (2)
नंदूरबार: 19 (1)
नाशिक मंडळ एकूण: 857 (40)
पुणे: 118 (5)
पुणे मनपा: 1975 (141)
पिंपरी चिंचवड मनपा: 132 (3)
सोलापूर: 6
सोलापूर मनपा: 184 (10)
सातारा: 98 (2)
पुणे मंडळ एकूण: 2513 (161)
कोल्हापूर: 13 (1)
कोल्हापूर मनपा: 6
सांगली: 32
सांगली मिरज कुपवाड मनपा: 3 (1)
सिंधुदुर्ग: 5 (0)
रत्नागिरी: 18 (1)
कोल्हापूर मंडळ एकूण: 77 (3)
औरंगाबाद: 5
औरंगाबाद मनपा: 437 (12)
जालना: 12
हिंगोली: 58
परभणी: 1 (1)
परभणी मनपा: 1
औरंगाबाद मंडळ एकूण: 514 (13)
लातूर: 25 (1)
लातूर मनपा: 0
उस्मानाबाद: 3
बीड: 1
नांदेड: 3
नांदेड मनपा: 30 (3)
लातूर मंडळ एकूण: 62 (4)
अकोला: 9 (1)
अकोला मनपा: 134 (10)
अमरावती: 4 (1)
अमरावती मनपा: 78 (11)
यवतमाळ: 95
बुलढाणा: 24 (1)
वाशिम: 1
अकोला मंडळ एकूण: 345 (21)
नागपूर: 2
नागपूर मनपा: 222 (2)
वर्धा: 0
भंडारा: 1
गोंदिया: 1
चंद्रपूर: 1
चंद्रपूर मनपा: 3
गडचिरोली: 0
नागपूर मंडळ एकूण: 230 (2)
इतर राज्ये: 35 (8)
एकूण: 20 हजार 228 (779)


राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1243 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 12 हजार 388 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 55 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.


Free ST Service | एसटीने मोफत प्रवास करण्यासाठीच्या फॉर्मबद्दल परिवहन मंत्री सतेज पाटील यांची माहिती