पालघर: महाराष्ट्र-गुजरात सीमाभागात (maharashtra gujarat border dispute) असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतींच्या हद्दीवरील महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या (maharashtra gujarat border dispute) सीमा निश्चित करण्याची मागणी होऊ लागली आहे. महाराष्ट्र राज्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी व गुजरात राज्यातील उंबरगाव तालुक्यातील  सोलसुंबा येथील हद्दीच्या भागात अतिक्रमण वाढून महाराष्ट्र व गुजरात राज्यात वादाचे प्रसंग वारंवार उद्भवत आहेत. त्यामुळे गावांची सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. (maharashtra gujarat border dispute) 

Continues below advertisement

कारण यानंतर आता सीमा मोजणीच्या हालचाली दोन्ही राज्यांकडून काल करण्यात आल्या यामध्ये पालघर जिल्ह्यातील  तलासरी तहसीलदार आणि गुजरात राज्यातील उंबरगाव तहसीलदार यांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली असं सांगण्यात येते मात्र स्थानिक उपसरपंच आणि नागरिकांनी या मोजणीवर आक्षेप घेत हे मोजणी स्थगित करण्यात आल्याचा सांगितलं आहे.(maharashtra gujarat border dispute) 

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर तलासरी तालुक्यातील वेवजी, गिरगाव, घीमाणीया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतींच्या हद्दीवरील महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या सीमा निश्चित करण्याची मागणी होऊ लागली आहे. वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नं. २०४ चा भूखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नं. १७३ या दोन भूखंडांवर दोन राज्यांची सीमा आहे. हद्द निश्चित नसल्याने वेवजीमध्ये गुजरात राज्याच्या इमारती उभ्या राहात आहेत. गूगल नकाशात महाराष्ट्र सीमेवरील वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, अच्छाड, संभा ही गावे गुजरात राज्यात दाखवण्यात आल्याने प्रशासनाकडून चूक दुरुस्त करण्यासाठी  पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. (maharashtra gujarat border dispute) 

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या सीमेलगत वेवजी येथे गुजरातमधील नागरिकांनी घुसखोरी केल्याने महाराष्ट्र-गुजरात सीमा वाद सतत उफाळून येत आहे.  या बाबत एबीपी माझाने या पूर्वीही वृत्त प्रसारीत केलं आहे, त्यानंतर हद्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्याचे दिसून येत आहे. पालघर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्य यांच्यातील सीमेची हद्द निशाणी निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १३३ नुसार कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार काल मोजणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.त्यामुळे सीमेचा वाद मिटण्याची चिन्हे दिसत आहेत.महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सुरू असलेला हा सीमावाद लवकरात लवकर मिटवण्यासाठी प्रशासनाने गंभीर पाऊले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.