मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने एकूण 16 सहकारी साखर कारखान्यांना थकहमी अर्थात मार्जिन लोन (Margin Money Loan) मंजुरीचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. या कारखान्याच्या यादीत आधीचे 11 आणि नव्याने पाच कारखान्यांचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि अहमदनगरचे विवेक कोल्हे यांच्या कारखान्यांना वगळून सत्ताधाऱ्यांशी संबंधित पाच कारखान्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.  

Continues below advertisement

या यादीमध्ये 11 सहकारी साखर कारखान्याचे प्रस्ताव यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेले आहेत. मात्र त्यातील काही थोडीफार नव्याने कर्जाच्या आकडेवारीमध्ये बदल करण्यात आला आहे. बुधवारी त्यात नव्याने पाच कारखान्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. 

नव्याने  थकहमी दिलेल्या राज्यातील 5 सहकारी साखर कारखान्यांची नावे,

1 - लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असूनसुद्धा ऐनवेळी भाजपाला पाठिंबा दिलेले अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 347 कोटी रुपयाची थकहमी देऊन जाहीर सभेत दिलेला शब्द देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला आहे. 2 - भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्या किल्लारी सहकारी साखर कारखान्याला 22 कोटी रुपये थकहमी मंजूर करण्यात आली आहे. 3- नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याला 90 कोटींची मदत देण्यात येणार आहे. हा कारखाना अजित पवार समर्थकाचा सहकारी साखर कारखाना आहे. 4 - सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आणि जयंत पाटील समर्थक आमदार मानसिंग नाईक यांच्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याला 65 कोटी रुपयांची थकहमी देण्यात आलेली आहे. आमदार मानसिंग नाईक यांनी विधानपरिषद निवडणुकीत अजित पवारांना मदत केली असल्याचा आरोप शेकापचे जयंत पाटील यांनी केला होता. 5 - नागनाथ अण्णा नाईकवडे  यांच्या क्रांतिवीर सहकारी साखर कारखान्याला 148 कोटी रुपयांची थकहमी देण्यात आलेली आहे.  

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार धैर्यशील माने यांना लोकसभा निवडणुकीत नागनाथ अण्णा नाईकवाडे यांनी राजकीय मदत केल्यामुळे हा आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

त्यामुळे राज्यातील एकूण 16 सहकारी साखर कारखान्यांना 2265 कोटी रुपयांचा थकहमीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मंजूर करून राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात एनसीडीसीकडे पाठविला आहे.

वरील पाच कारखान्यांव्यतिरिक्त या यादीतील इतर कारखाने

अजित पवार गटाशी संबंधित कारखाने

- लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड)- 104  कोटी- किसनवीर (सातारा)- 305 कोटी- किसनवीर (खंडाळा)- 150 कोटी- लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना(नेवासा) - 150 कोटी- अगस्ती (अहमदनगर) - 100 कोटी- अंबाजोगाई (बीड)- 80 कोटी- शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा)- 110 कोटी

भाजपशी संबंधित कारखाने

- संत दामाजी(मंगळवेढा) - 100 कोटी,- वृद्धेश्वर (पाथर्डी)- 99 कोटी- तात्यासाहेब कोरे वारणानगर (कोल्हापूर) -350 कोटी- बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई (धाराशिव) -100 कोटी

ही बातमी वाचा :