Governor Controversial Statement LIVE : राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य, शिवप्रेमींमध्ये संताप! वाचा प्रत्येक अपडेट
राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपालांवर टीका होतेय.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Feb 2022 01:18 PM
पार्श्वभूमी
औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. समर्थ रामदास...More
औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं आज पुण्यात आंदोलन करणार आहे. सकाळी 10.30 वाजता हे आंदोलन सुरु होणार आहे. नेमकं काय म्हणाले राज्यपाल कोश्यारीसमर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो असंही कोश्यारी म्हणाले. औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजेराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे की, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. राम मंदिर कार्यक्रम सुरू असताना मला समर्थ रामदासांचे नाव आठवत होते. शक्तीची सर्वत्र पूजा होते. वेळोवेळी देशात संतांचे कार्य दिसले आहे. शक्ती सर्वकाही आहे, त्यामुळे शक्तीची आराधना केली जाते. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. चाणक्याविना चंद्रगुप्तांना कोण विचारेल? समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारणार? असं राज्यपालांनी म्हटलं आहे. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे, असंही ते म्हणाले. नोट आणि वोटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे. माजी आमदार, खासदारांना कोणी विचारत नाहीत, असंही ते म्हणाले. खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle )यांची राज्यपालांवर टीकाखासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle )यांनी देखील राज्यपालांवर टीका केली आहे. उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, राष्ट्रमाता जिजाऊ (Jijau) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकीचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
HSC Exam : NDA ची मुलाखत की 12 वीचा पेपर? मुलाखत देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत बोर्डाकडून दखल
HSC Exam : एनडीए ची मुलाखत देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी बाबत बोर्डाकडून दखल घेण्यात आली आहे. 'एबीपी माझा' च्या बातमीची बोर्डाकडून दखल
एनडीएला बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती पुढे घेण्यात याव्यात या संदर्भात पत्र लिहिणार. बोर्डाकडून या संदर्भात तीन पर्याय समोर ठेवण्यात आले आहे