मुंबई : महाराष्ट्र सरकारने केरळ सरकारकडे तज्ञ डॉक्टर आणि नर्सेस द्यावे अशी मागणी केली आहे. केरळच्या आरोग्य मंत्र्यांना महाराष्ट्राच्या आरोग्य शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने यांनी पत्र पाठवून विनंती केली आहे. भविष्यात पुणे आणि मुंबईत रूग्णांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे आणखी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफची गरज पडणार आहे. मुंबई पुण्यात आवश्यकतेनूसार नव्या आरोग्य व्यवस्था उभ्या कराव्या सांगणार आहे.


केरळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना डॉक्टर लहाने यांनी संपर्क साधला आहे. त्यानुसार किमान 50 तज्ञ डॉक्टर आणि 100 नर्स देण्याच्या विनंती लहाने यांनी केली आहे. विशेष म्हणजे करारावर आलेल्या ह्या आरोग्य कर्मचारांना चांगले मानधन मिळणार आहे. एमबीबीएस डॉक्टरांना 80 हजार, तज्ञ डॉक्टरांना 20 लाख तर नर्संना 30 हजार मानधन मिळेल. केरळहून आलेल्या ह्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासाचे, जेवणाची आणि योग्य ती सुरक्षा देण्याची हमी महाराष्ट्र सरकारने दिली आहे.


Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार पार, आज दिवसभरात 3041 रुग्णांची नोंद


केरळला जमलं
देशात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण केरळ राज्यात आढळला होता. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या केरळमध्ये झपाट्याने वाढत होती. मात्र, त्यानंतर केरळच्या सरकारने कडक अमलबजावणी करत कोरोनावर यशस्वी नियंत्रण मिळवलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी केरळने कशी योजना राबवली याचीही माहिती राज्य सरकार घेत आहे. सोबतचं आता महाराष्ट्र सरकारने केरळकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 47 हजारांवर
राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार गेला आहे. तर आज एकाच दिवशी तीन हजारहून अधिक रुग्ण राज्यात आढळले आहे. राज्यात आज 3041 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. अशारीतीने राज्य़ाचा कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे. दिवसभरात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूंची संख्या 1635 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1196 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 14 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या राज्यात 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


Corona Ground Report कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट