मुंबई : महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (23 मार्च) राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार प्लास्टिक उत्पादक, व्यापारी आणि ग्राहकांना येत्या एक महिन्यात प्लास्टिक नष्ट करावं लागणार आहे.
मात्र, औषधांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक तसंच वन फलोत्पादनासाठी, कृषी आणि घनकचरा हाताळण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशवीला यातून वगळण्यात आलं आहे. तर दुधाची पिशवी दूध डेअरी, वितरक आणि विक्रेत्यांनाच पुन्हा खरेदी कराव्या लागतील.
राज्यभरात शनिवारपासून निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आणि पोलिसांना देण्यात आले आहेत.
दुधाच्या प्रत्येक पिशवीमागे 50 पैशांचा प्लास्टिक टॅक्स
ग्राहकांकडून प्लास्टिक संकलन करण्यासाठी प्लास्टिक कलेक्शन पॉईंट्स तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर उत्पादक आणि व्यापाऱ्यांना रिसायकल करण्याची सक्ती करण्यात आली आहे.
राज्यात गुढीपाडव्यापासून (18 मार्च) प्लास्टिक तसेच थर्माकॉल वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तर सरकारने 23 मार्चच्या रात्रीपासून अधिसूचना जारी केली.
अधिसूचनेनुसार दुधासाठीच्या 50 मायक्रॉनपेक्षा जाड प्लास्टिक पिशव्यांना बंदीतून वगळण्यात आलं आहे. मात्र या पिशव्यांची पुनर्प्रक्रिया-पुनर्खरेदी पद्धती विकसित करण्यासाठी अशा पिशव्यांसाठी ग्राहकांनाच 50 पैसे जास्त द्यावे लागतील. ग्राहकाने दूध डेअरी, वितरक आणि विक्रेत्यांना दुधाची रिकामी पिशवी केल्यावर ग्राहकाला ते पैसे परत मिळतील.
राज्यभरात प्लास्टिकबंदी, पर्यावरण मंत्र्यांची विधानसभेत घोषणा!