LIVE UPDATE | आघाडीचे नेते राज्यपालांना भेटायला जाण्याची शक्यता

बाळासाहेब आमच्यासाठी पुज्यनीय आहेत. तसेच उद्धव ठाकरेंवरही आम्ही कधी टीका केली नाही. आम्ही आमच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Nov 2019 08:18 PM
आघाडीचे नेते राज्यपालांना भेटायला जाण्याची शक्यता, संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या निवासस्थानी येणार, आघाडीचे वरिष्ठ नेतेही शरद पवारांच्या निवासस्थानी उपस्थित
काँग्रेसचे बडे नेते शरद पवार यांच्या भेटीला,
सिल्व्हर ओकवर मोठ्या राजकीय घडामोडी,
शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत खलबतं
इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेवर खोटारडेपणाचा आरोप झाला - उद्धव ठाकरे
खोटेपणा मान्य करत नाही, तोपर्यंत चर्चा करणार नाही - उद्धव ठाकरे
युती ठेवायची, की तोडायची हे भाजपने ठरवावे - उद्धव ठाकरे
मी शिवसेना प्रमुख यांना वचन दिले आहे, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच! उद्धव ठाकरे यांची ठाम भूमिका
मला खोटे ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न काळजीवाहूने करू नये उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
मी सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही : उद्धव ठाकरे
भाजपला शत्रू मानत नाही, पण खोटं बोलू नये - उद्धव ठाकरे
शब्द देऊन फिरवण्याची भाजपची प्रवृत्ती - उद्धव ठाकरे
खोटं बोलणं कोणत्या हिंदूत्वात बसतं - उद्धव ठाकरे
बहुमत नसताना सरकार कसं येणार? भाजपचा सरकार येणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचा सवाल
शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची गरज नाही : उद्धव ठाकरे
थोड्याच वेळापूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री होणार, भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
भाजप-शिवसेना ही हिंदुत्वावर आधारित युती आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, भाजप-शिवसेना युतीचं सरकार अजूनही सत्तेत येऊ शकतं. ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास. ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे नैसर्गिक सुत्र आहे - नितीन गडकरी
भाजपचे सर्व नेते काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल

पार्श्वभूमी

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी मित्रपक्ष शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द भाजपने कधीच दिला नव्हता. तसेच पुढचं सरकार भाजपच स्थापन करेल, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.

शिवसेना ज्या भाषेत बोलत आहेत, त्या भाषेत आम्हीही उत्तरं देऊ शकतो. मात्र आम्ही आमची मर्यादा कधीही ओलांडली नाही. शिवसेनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींवरची टीका विखारी होती. मात्र आम्ही दिवंगत बाळासाहेब ठाकरेंबद्दल कधीही चुकीचं वक्तव्य केलं नाही. बाळासाहेब आमच्यासाठी पुज्यनीय आहेत. तसेच उद्धव ठाकरेंवरही आम्ही कधी टीका केली नाही. आम्ही आमच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.