Maharashtra Flood: धाराशिव, बीड, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सलग पावसाने पूरस्थिती निर्माण केली आहे. मुंगशी, माढा व करमाळा तालुक्यांच्या सीमेवरील गावांमध्ये रात्रभर सीना कोळेगाव प्रकल्पातून 6 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या प्रकल्पामुळे सीना नदीची पातळी 100 वर्षांतील सर्वाधिक गाठली असून, पाटबंधारे विभागाचे अधिकारी पूर परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत. प्रकल्पातील पाणीसाठा 90 टक्के स्थिर ठेवला असून दहा टक्के बफर झोन राखण्यात आला आहे. पुढील आठ तासांत बीड भागातील पावसाचे पाणी प्रकल्पात दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रकल्पाची विसर्ग क्षमता 1 लाखांहून कमी करून 95 हजारावर केली असून, 21 दरवाज्यांमार्फत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या 84 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उद्या 12वी बोर्डाचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस, सर्व पुस्तके भिजली
या परिस्थितीत परांडा तालुक्याच्या एका गावातील बारावीतील विद्यार्थी स्नेहल तांबे चिंतेत आहे. उद्या बारावी बोर्ड परीक्षांचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस असून, तिच्या गावात सलग पाणी शिरल्यामुळे घरातील सर्व पुस्तके, नोट्स आणि साहित्य भिजून गेले आहेत. स्नेहलने म्हटले, “गावाला पाण्याचा वेढा आहे, आता फॉर्म भरायला कसे पोहोचावे? असा प्रश्न तिला पडलाय.
स्नेहल परांडा तालुक्यातील शाळेत बारावी मध्ये शिकत असून उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. अनेक गावात पुराचे पाणी आल्याने फॉर्म भरायला कसे पोचायचे असा प्रश्न ती करीत आहे . शासनाने तातडीने फॉर्म भरण्यास मुदत वाढ न दिल्यास आमचे वर्ष वाया जाईल अशी भीती तिला वाटत असून तिच्या डोळ्यातले पाणी थांबत नाही . अचानक आलेल्या पाण्यामुळे वर्षभर अभ्यास करून काढलेल्या नोट्स वह्या पुस्तके सर्व पाण्यात जाऊन खुजली आहे .. आता चार चार वेळा सामान हलवताना छोटी छोटी कोंबड्याची पिली मेली .. सारखे जड सामान हलवून पोटात दुखतय .. आता फॉर्म ची नवीन काळजी लागली .. फॉर्म भरायला जायला किमान 40 किलोमीटर वळसा घालून कोणाच्यातरी मदतीने पोहोचावे लागेल .. आणि शेतातलं सगळं वाहून गेल्याने फॉर्म भरल्यावर दप्तर वह्या पुस्तकांना पैसे कुठून आणायचे असा सवाल स्नेहल नी केला आहे ...
नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता राखणे आवश्यक
सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीना कोळेगाव प्रकल्पात पाणीसाठा नियंत्रणात ठेवला आहे, तरीही नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता राखणे आवश्यक आहे. धाराशिव, बीड, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील नदीच्या प्रकल्पात सतत पाण्याचा आढावा घेतला जात आहे. स्नेहलसारख्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने तातडीने फॉर्म भरण्यास मुदत वाढ देणे आणि वह्या-पुस्तकांसाठी मदत करणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थ आणि शिक्षक दोघेही व्यक्त करत आहेत. या पूरस्थितीमुळे केवळ शैक्षणिक वर्ष नाही तर पूरग्रस्त कुटुंबांचे उत्पन्न आणि शेतातील पिके यावरही गंभीर परिणाम होत आहेत.