- दरडोई उत्पन्नात १ लाख 32 हजार 341 रुपयांवरून 1 लाख 47 हजार 399 रुपये वाढ अपेक्षित आहे.
- कृषी व सलग्न क्षेत्रात 12.5 टक्के वाढ अपेक्षित
- उद्योगक्षेत्रात 6.7 टक्के, तर सेवा क्षेत्रात 10.8 टक्के वाढ अपेक्षित
- राज्याच्या महसूली जमेत गेल्यावर्षीच्या तुलनेत 11.4 टक्के वाढ अपेक्षित
- राज्यावरचे कर्ज ३ लाख ५६ हजार 213 कोटी रुपयांवर
- पाऊस चांगला झाल्याने कृषीक्षेत्रातही भरघोस वाढ
- ऊस वगळता इतर पिकांचे विक्रमी उत्पादन
- तृणधान्य 80 टक्के, कडधान्य 187 टक्के, तेलबिया 142 टक्के तर कापसाच्या
- उत्पादनात 83 टक्के भरघोस वाढ अपेक्षित
- ऊसाच्या उत्पादनात मात्र 28 टक्के घट अपेक्षित
- रब्बी हंगामातील उत्पादनातही भरघोस वाढ
- राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेची गती मंदावली
- गेल्यावर्षीच्या तुलनेत जलयुक्त शिवार योजनेवर झालेला खर्च अतिशय कमी आहे
- या वर्षी मंजूर झालेल्या 1400 कोटींपैकी फक्त 85 कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केले.
- राज्यात 31 मार्च 2016 रोजी 4.99 कोटी सभासद असलेल्या 1.97 लाख सहकारी संस्था होत्या. त्यापैकी 11 कृषी पतपुरवठा,11 टक्के बिगर कृषी पतपुरवठा तर 78 टक्के इतर संस्था
- एकूण 20.3% सहकारी संस्था तोट्यात त्यापैकी 29.2 % कृषी पतपुरवठा संस्था होत्या.
- राज्यातील सहकारी संस्थांमधील कर्जाची थकबाकी वाढली
- वर्ष 2014 मध्ये थकबाकी ही 1,33,064 कोटी होती 2015 मध्ये ती 1,44,748 झाली तर 2016 मध्ये ही वाढून 1,51, 533कोटी झाली
- गेल्यावर्षीच्या तुलनेत कर्ज थकबाकी ही 4.7 % ने वाढली
- राज्यात खाजगी सावकारांना मोकळीक
- 1,947 खाजगी सावकारांना सावकारीची परवानगी
- राज्यात 12, 208 परवाना धारक खाजगी सावकार
- वर्ष 2016 मध्ये 10 लाख 56 हजार लोकांनी घेतलं सावकाराकडून कर्ज
- 1254.97 कोटी रुपयांचं कर्ज खाजगी सावकाराकडून लोकांनी घेतलं
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर, जलयुक्त शिवारची गती मंदावली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Mar 2017 01:22 PM (IST)

NEXT
PREV
मुंबई: राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे 2016-17 मध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नात 9.4 टक्के वाढ अपेक्षित आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -