धुळे : 'साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा' अशी म्हण आधी म्हटली जात होती, मात्र आता त्या म्हणीत बदल झाला आहे. "नेते मंत्री येती शहरा, तो रस्ते दुरूस्तीचा सोहळा" अशी म्हण म्हण्याची वेळ नागरिकांवर आता आली आहे. त्याला कारणही तसे आहे धुळे शहरातील देवपूर भागात गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी अनेक सामाजिक संघटना व नागरिक रस्त्यावर उतरले मात्र त्यांच्या मागणीकडे धुळे मनपान दुर्लक्ष केले. मात्र अचानक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा धुळे दौरा 22 एप्रिल रोजी निश्चित झाल्याने झोपेचे सोंग घेतलेले धुळे मनपा खडबडून जागी झाली आणि रातोरात देवपूर परिसरातील रस्त्यांचे काम जलद गतीने धुळे मनपा कडून करण्यात येत आहे.
त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना कडून एकच मागणी होत आहे की, केंद्रीय मंत्र्यांनी वारंवार धुळे दौरा करावा जेणेकरून यानिमित्ताने का होईना धुळे शहरातील रस्ते चकाकतील अशी अनोखी मागणी आता नागरिक सध्या करीत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या उपस्थितीत धुळे शहरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी देवपुरातील एका कार्यकर्त्याच्या निवासस्थानी नितीन गडकरी जाणार आहेत. यामुळे गणपती पुलापासून तर कार्यकर्त्याच्या घरापर्यंतच्या रस्ता दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या आधी भूमिगत गटारीच्या ठेकेदाराने या रस्त्यावर फक्त पॅच मारून सोडून दिल्याने सध्या रस्त्यावरून चालणे अवघड होते. मात्र या कार्यकर्त्याशिवाय धुळे शहरातील ज्या रस्त्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जाणार आहेत. त्या रस्त्यांचे देखील भाग्य उजळणार आहे यात शंका नाही.
संबंधित बातम्या :