आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येत्या 26 तारखेला धनगर समाज सुंबराण आंदोलन करणार आहे. या अधिवेशनात धनगर आरक्षण सोडवला नाही तर, थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासह इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. बीडमध्ये काल राज्यस्तरीय धनगर समाजाच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर यशवंत सेनेचे संस्थापक भारत सोन्नर माध्यमांशी बोलत होते.
खरंतर भाजप- शिवसेना सरकारच्या काळातच धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला होता आणि त्यावेळी विरोधी पक्षात असलेले काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धनगर समाजाला आरक्षण संदर्भामध्ये अनेक आश्वासने दिले होते. आता स्वतः सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेससोबत शिवसेनेचेसुद्धा नेते आहेत म्हणून त्यांनी लवकरात लवकर धनगर आरक्षणाची घोषणा करावी अशी मागणी यशवंत सेनेकडून करण्यात आली आहे.
जर या सरकार ने आरक्षण प्रश्न सोडवला नाही तर थेट मुख्यमंत्री आणि ईतर मंत्र्यांच्या घरात मेंढर सोडण्याचा धमकी वजा इशारा दिला आहे.
धनगर आरक्षण खडतर? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
कोणत्या मुद्द्यांआधारे आरक्षणाची मागणी?
- बॉम्बे रजिस्ट्रेशन अक्टमध्ये ‘धनगर’ ऐवजी ‘धनगड’ असा उल्लेख
- प्रत्येक राज्यात उच्चार धनगर असो किंवा धनगड, अर्थ समान असल्याचा दावा
- वर्षानुवर्षे धनगरांचा मेंढीपालनाचा व्यवसाय
- नृत्य, गायन, देव-देवतांसंदर्भात धनगरांची खास संस्कृती
- मानववंश शास्त्र आणि सामाजिक दृष्ट्या धनगर भटकी जमात असल्याचा उल्लेख
- समाजाचा समावेश आदिवासी जमातीत का नाही, असा प्रश्न भटक्या विमुक्तांच्या अभ्यासकांनी केला
- बिहार आणि झारखंडमध्ये धनगरांचा समावेश आदिवासी जमातीत
धनगर समाजाबाबत टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल काय? | धनगर आरक्षण | एबीपी माझा
संबंधित बातम्याल :