मुंबई : तुमच्या आवडीच्या 'एबीपी माझा'ने आणखी एक यशाचं शिखर गाठलं आगे. मुंबईत पार पडलेल्या ENBA पुरस्कार सोहळ्यात एबीपी माझाचा डंका पाहायला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदक, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम आणि सर्वोत्कृष्ट कव्हरेजसाठीही एबीपी माझाला गौरवण्यात आलं आहे.



एबीपी माझाच्या 'पोस्टमन माझा' या कार्यक्रमाला उत्कृष्ट कार्यक्रमासाठीचा पुरस्कार मिळाला आहे.


पाहा व्हिडीओ : ENBA पुरस्कारात एबीपी माझाचा डंका, सर्वोत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार | ABP Majha



2019मध्ये सांगली, सातारा, कोल्हापूरात पावसाने हाहाकार माजवला होता. अशातच नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यावेळी एबीपी माझाच्या रिपोर्टर्सनी पुराच्या क्षणक्षणाची अपडेट लोकांपर्यंत पोहोचवली. याचीच पोचपावती म्हणून पुराच्या कव्हरेजसाठीही एबीपी माझाचा गौरव करण्यात आला. एबीपी माझाला ENB पुरस्कार सोहळ्यात सांगली आणि कोल्हापूर पुराच्या वेळी केलेल्या वार्तांकनाला उत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.



एबीपी माझाचे मुंबई ब्युरो चीफ गणेश ठाकूर यांना एबीपी न्यूजच्या 'मदर इंडिया का दर्द' या स्टोरीसाठी बेस्ट प्राइम टाईम शो पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.


पाहा व्हिडीओ : ENBA पुरस्कारात एबीपी माझाचा डंका, 'पोस्टमन माझा' उत्कृष्ट कार्यक्रम



ENB पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट वृत्तनिवेदक म्हणून माझाचे उस्मानाबादचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि अभिजीत करंडे यांना गौरवण्यात आलं आहे.