पुणे : पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पुण्यात (Pune Lockdown)नवीन निर्बंध तसेच गणेशोत्सवासंबंधी (pune ganesh utsav 2021) महत्वाचं भाष्य केलं. पुण्यात नवीन निर्बंधाविषयी चर्चा झाली. पण नवीन निर्बंध लावणार नाहीत. पुण्यात रात्रीपर्यंत लोकं बाहेरुन येतात. सगळेजण गणेशोत्सवासाठी येत असतात. पण यंदा देखावे नाहीत, त्यामुळं गर्दी होण्याची शक्यता नाही. पण गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीचा अंदाज घेऊन गरज पडली तर दुसऱ्याच दिवशी कठोर भूमिका घेऊ शकतो, अशा प्रकारची वेळ कृपा करुन येऊ देऊ नका, असं आवाहन देखील अजित पवारांनी केलं आहे. 


Ajit Pawar : राज्य सहकारी बँकेवर ईडीची कुठलीही छापेमारी नाही : अजित पवार


मास्क काढल्यामुळं आणि कार्यक्रमांमुळं कोरोना वाढत आहे. काळजी घेणं गरजेचे आहे. कोरोनाची संख्या जर वाढणार असेल तर पुन्हा कठोर भूमिका घ्यावी लागेल, असंही पवार म्हणाले. अजित पवार म्हणाले की, गणेशोत्सव येतोय. तो साजरा करा पण मोठ्या गणपतींबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील तो मान्य करावा अशी माझी मंडळं तसेच भक्तांना विनंती आहे. शाळात मोठ्या प्रमाणत लसीकरण करायचं आहे, संस्थांमध्येही लसीकरण करायचं आहे, असंही ते म्हणाले. 


ते म्हणाले की, शाळा सुरू करण्याचा निर्णय होईल त्यानंतर ज्यांनी दोन डोस घेतले आहेत त्यांना शाळेत प्रवेश द्यावा.  गणेशोत्सवात मंडळं सहकार्य करत आहेत. साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यामुळे अजून आपण चर्चा करून निर्णय घेऊ,पहिल्या दिवशी गर्दी वाढली तर दुसऱ्या दिवशी पासून कडक नियम करू, असं पवार म्हणाले. 


केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, अच्छे दिन येणार म्हणून लोकांनी निवडून दिलं. पण पेट्रोल डिझेल गॅस किमती वाढल्या की सामान्य जनता महागाईनं ग्रासून जाते. कोरोनामुळे केंद्राने हे दर आवाक्यात ठेवायला हवे होते. आता अधिवेशन झालं त्यामुळे आता यावर केंद्राने लक्ष दिलं पाहिजे, असं ते म्हणाले. 


अजित पवार म्हणाले की, राज्यात अनेकांची आहे मंदिरं उघडली पाहीजे. पण जर गर्दी झाली तर कोरोना वाढू शकतो. केंद्राने सण साध्या पद्धतीने करा असे सांगितले आहे. भाजपने त्याच्या केंद्रातील आरोग्य विभागाने काय सांगितले आहे ते पाहावे, असंही पवार म्हणाले.