Neral: नेरळ येथे उकृल ग्रामपंचायत हद्दीत आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. दौलत देशमुख असे या मृत व्यक्तीचे नाव असून, आयोजकांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे त्याला आपला प्राण गमवावा लागला आहे, या प्रकरणी आयोजकांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


फ्लदौलत देशमुख अस मृत व्यक्तीचं नाव आहे, बैलगाडी शर्यत सुरू होताच एक बैलगाडी रिंगण सोडून थेट प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन शिरल्याने उपस्थित असलेले कर्जत येथील चोचीची वाडीत राहणारे दौलत देशमुख या प्रेक्षकाला बैलाचे शिंग लागले, तर उपस्थित प्रेक्षकांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ केल्याने या चेंगराचेंगरीत दौलत देशमुख हे आणखी जखमी झाले, देशमुख यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी अयोजकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय.


सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र बैलगाडी शर्यतीत आयोजकांकडून नियमांचे सर्रासपणे पायदळी तुडवून नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा समोर आला आहे, अशीच एक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे, कर्जत तालुक्यात उकृल ग्रामपंचायत हद्दी मध्ये ही बैलगाडी शर्यत आयोजन करण्यात आला होता, शर्यत खेळण्यासाठी ठाणे, भिवंडी, पालघर, पनवेल, कर्जत येथून मोठ्या प्रमाणावर बैलगाडा प्रेमी सहभागी झाले होते, यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिक देखील शर्यत बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. वास्तविक बैलगाडी शर्यत आयोजकांकडून कुठलेही उपाययोजना तिथे उपस्थित करण्यात आली नव्हती तर शासनाच्या अनेक नियमांचे उल्लंघन करत आयोजकांकडून शर्यत ठेवल्या जात असल्याचे समोर आले आहे. मात्र या नियोजन शून्य कारभारामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्याधिकारी आता येथील शर्यतीचे व्हिडिओ आयोजकांकडून मागवून चुकीला शासन करणार का ? हे पहावं लागेल.i


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha