Maharashtra Day Wishes 2022 : महाराष्ट्र दिन (Maharashtra Day)  हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिच्या कुशीत अनेक महान व्यक्तिमत्व जन्माला आलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांपासून तर तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर धर्मरक्षक संभाजी महाराजांपर्यंत सगळेच या महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला आलेले आहेत. मराठी माणसासाठी हा दिवस म्हणजे मोठा उत्सवच असतो. अशा वेळी मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश तुमच्यासाठी...


1. महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वांना मानाचा मुजरा..!
आंतरराष्ट्रीय कामगार दिन
आणि महाराष्ट्र दिनानिमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!


2. आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!


3. माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!


4. जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन आणि कामगार दिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!


5. मर्द मराठ्यांचा हा मुलुख
शांतता, आनंद आणि अभिमान असलेल्या
महाराष्ट्राचा अभिमान आहे मला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!


6. दरी दरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
कामगार दिन आणि महाराष्ट्रदिन
निमित्त सर्व नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा..!


7. ज्ञानाच्या देशा,


प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा,


महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...!


महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा...!


महत्वाच्या बातम्या :