Maharashtra Dam Water Storage: राज्यात सध्या तापमानाचा भडका उडाला आहे. बहुतांश ठिकाणी 36 अंश सेल्सियस होऊन अधिक तापमानाची नोंद होत आहे. होळीपासून राज्यात खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात होते. आत्तापासूनच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावं लागतंय . होळीदिवशी (13 मार्च) राज्यातील धरणांमध्ये सरासरी 53 .41% .पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितलंय . मागील वर्षीच्या तुलनेत साधारणतः 10% पाणीसाठा अधिक असल्याचंही नोंदवण्यात आलंय . (Dam Water)
गेल्यावर्षी सरासरी होऊन कमी पाऊस, अवकाळी पावसाचा फटका, प्रचंड तापमान आणि हवामानातल्या टोकाच्या बदलांनी अनेक धरण साठे शून्यावर गेले होते .त्यानंतर हळूहळू पाणीसाठा वाढत गेला. दरम्यान,उन्हाळ्याच्या तोंडावर धरणांमध्ये किती पाणी आहे ? पाहूया सविस्तर ..
कोणत्या विभागात किती पाणी साठा ?
राज्यात लघु मध्यम आणि मोठ्या अशा 2997 धरण प्रकल्पांमध्ये होळीच्या दिवशी ( 13 मार्च) 53.41% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे .नागपूर व अमरावती विभागात 49.30%,57.88% पाणीसाठा आहे .मराठवाड्यातील 920 धरणांमध्ये 52 टक्के पाणी शिल्लक राहिले असून मागील वर्षी याच सुमारास मराठवाड्यात केवळ 23.53% पाणीसाठा शिल्लक होता .नाशिकच्या 537 धरणांमध्ये आज 53.68% पाणी शिल्लक आहे .पुणे विभागातील धरणांमध्ये 52.97% तर कोकण विभागात 58.13% पाणीसाठा आहे .
जायकवाडीसह उजनीत किती पाणी शिल्लक?
मराठवाड्यातील हजारो नागरिकांची तहान भागवणारे जायकवाडी धरण सध्या 63 टक्क्यांवर आहे . गेल्यावर्षी जायकवाडीत याच दिनांक 24.44% पाणी शिल्लक होतं .पुण्यातील डिंभे धरण 45.36% भाटघर 61.55% तर खडकवासला 69 टक्क्यांवर आहे .मागील वर्षी यात सुमारास शून्यावर असलेले उजनी सध्या 43.29 टक्क्यांवर आहे असे जलसंपदा विभागाने सांगितले .धाराशिव चे निम्न तेरणा मागील वर्षी 5.53 टक्क्यांनी भरले होते आता तेरणात 74.02% पाणीसाठा शिल्लक आहे .नाशिकच्या गंगापूर धरणात 72.53% गिरणा धरणात 42.96% तर भाम धरण 46.85% भरले आहे.
राज्यात मार्चमध्ये ते मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत उन्हाळ्याचा तडाखा असतो .तापमानाचा पारा सातत्याने चढा राहतो .त्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर झाल्याने तसेच विसर्ग केल्याने महिनाभरानंतर पाणीटंचाईचे सावट गडद होण्याची शक्यता असते .सध्या राज्यात ठीक ठिकाणी उष्णतेच्या लाटा फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरू झाल्या आहेत .भारतीय हवामान विभागाने यंदा सर्वाधिक तापमानाचे राहणार असल्याचा इशाराही दिलाय .यंदा उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर मंगळवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला (39.5 अंश) जिल्ह्यात नोंदवल्या गेलंय. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) आज 12, आणि 13 मार्चला विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा(IMD Forecast) दिला आहे. 12 आणि 13 मार्चला चंद्रपूर जिल्ह्यात देखील हिट व्हेवचा इशारा हवामान विभागाने दिलाय.