Bhandara Crime News : आजपर्यंत तुम्ही अनेक चोरीचे प्रकार बघितले असतील, मात्र भंडाऱ्यात भिकाऱ्याचं सोंग घेत दुकानासमोर झोपुन रात्री तेच दुकान फोडून चोरी करणारा सराईत गुन्हेगार भंडारा शहर पोलिसांच्या हाती लागला आहे. संतोष राजपूत (वय 37) वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या गुन्हेगारीचा आलेख बघता भंडारा पोलिसही चक्रावले आहे. त्याच्यावर भंडारा जिल्ह्यात 8 तर नागपुर जिल्हात 22 दुकानफोडी, तसेच घरफोडीची नोंद आहे. पोलिसांनी त्याच्याकडून घरफोडीचे साहित्यही जप्त केले आहे. ही संपूर्ण घटनाक्रम CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


आधी घेतलं भिकाऱ्याचं सोंग, मग दुकानात केली चोरी 


भंडारा शहरातील मोठ्या बाजार परिसरात अनेक दिवसापासून दुकान फोडीचे प्रकार वाढले होते. प्रसार माध्यमांचा वाढता दबाब लक्षात घेता भंडारा पोलिसांची गुन्हे अन्वेषण पथक चोरटयाला जेरबंद करण्यास प्रयत्नशील होते. रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग करत असतांना भंडारा पोलिस पथकाला मोठ्या बाजारात एक दुकानाचे शटर उघडे दिसून नुकतेच चोरी झाल्याचे दिसले. चोर आजुबाजुला असल्याचे लक्षात घेता पोलिसांनी अख्ख शहर पिंजुन काढले. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा बसस्थानक परिसरात आरोपी संतोष संशयितरित्या फिरताना दिसला. त्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविल्याने त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.


आतापर्यंत 30 गुन्हाची नोंद, घरफोडीचे साहित्यही जप्त


या गुन्हेगाराने भंडारा जिल्ह्यात 8 दुकानफोड़या तर नागपूर जिल्ह्यात 20 दुकानफोडी व 2 घरफोडी असे एकूण 30 चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे. तर या सराईत गुन्हेगाराच्या अटकेने अनेक गुन्ह्याची माहिती मिळाली आहे. 


महत्वाच्या बातम्या: