Maharashtra Covid-19 cases Live Updates : राज्यात आज 893 नवे रुग्ण आढळले, 8 जणांचा मृत्यू
Maharashtra Covid-19 cases Live Updates 27 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.
दिल्लीज आज 484 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
पुण्यात आज 144 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 46, पुणे ग्रामीण 55 रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत आज 103 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 165 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
रविवारी राज्यात 782 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत राज्यात फक्त दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. दैनंदिन रुग्णांच्या सख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्यातही कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज जवळपास 21 ठिकाणी दहा पेक्षा कमी रुग्णसंख्या आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 893 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एक हजार 761 रग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील आजपर्यंत एकूण 77,09,015 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.02 % एवढे झाले आहे.
राज्यात आज 893 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जवळपास 21 ठिकाणी दहापेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. आज सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात आढळले आहेत. मुंबईपेक्षाही पुण्यातील रुग्णांची संख्या जास्त आहे. पुणे मनपामध्ये आज 174 नवे रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवड मनपामध्ये 66 रुग्णांची भर पडली आहे. त्याशिवाय पुणे ग्रामीण 77 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज 89 रुग्णांची भर पडली आहे. ठाणे मनपा परिसरात 21 रुग्णांची नोंद झाली आहे. रायगडमध्ये 24 रुग्ण आढळले आहेत. तर नाशिकमध्ये 39, अहमदनगरमध्ये 64, बुलढाणा 42, नागपूर 21 , नागपूर मनपा 23 आणि गडचिरोलीमध्ये 23 नवे रुग्ण आढळले आहेत. चंद्रपूर, सांगली मिरज कुपवाड मनपा, मालेगाव मनपामध्ये आज एकही रुग्ण आढळला नाही.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण 7,811 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,64,516 इतकी झाली आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,77,44,579 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,64,516 (10.12 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1,40,942 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 743 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. दैनंदिन रुग्णांच्या सख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्यातही कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज जवळपास 21 ठिकाणी दहा पेक्षा कमी रुग्णसंख्या आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 893 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एक हजार 761 रग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील आजपर्यंत एकूण 77,09,015 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.02% एवढे झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -