मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींभोवतीही  कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील (Maharashtra Government) 12 मंत्र्यांसह विविध पक्षांतील जवळपास 70 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे.


 संजय राऊत यांच्या घरी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राऊत यांच्या आई त्यांची पत्नी,  मुलगी आणि पुतणीला कोरोना ची लागण झाली आहे. घरातील सदस्यांना सर्दी ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे या सर्वांची टेस्ट करण्यात आली ज्यामध्ये हे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले . या सर्वांना सौम्य लक्षणे असल्यामुळे सध्या तरी होम क्वारंटाईन  करण्यात आले आहे.


कोरोनाचा संसर्ग झालेल्या मंत्र्यांमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, के. सी. पाडवी आणि प्राजक्त तनपुरे यांच्यासह इतर सहा मंत्र्यांचा समावेश आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 


आमदार रोहित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, सागर मेघे, शेखर निकम, इंद्रनील नाईक, निलय नाईक, माधुरी मिसाळ चंद्रकात पाटील (मुक्ताईनगर) आणि आमदार किसन कथोरे यांच्यासह 61 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबरोबरच  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील-ठाकरे (हर्षवर्धन पाटील यांची मुलगी), दीपक सावंत आणि रामकृष्ण ओझा या नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या