दोन दिवसाच्या विकेंड लॉकडाऊननंतर पुन्हा नियमांचा फज्जा. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकांची झुंबड. पहाटेपासून भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा उडाला फज्जा
Maharashtra Full Lockdown LIVE: लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही हे माझं वैयक्तिक मत : बाळासाहेब थोरात
Maharashtra Corona Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 969 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 401 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये 9394 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा 60665 वर पोहचला असून आत्तापर्यंत 1269 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी दिली जाईल. रेमिडिसिव्हीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता, वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिले जाईल. तिथे गरजू रुग्णांनाच वापरले जाईल. जिल्हाधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील. ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत पुढचे पंधरा दिवस महत्वाचे असून याकाळात रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर आदी बाबी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू दिलं जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ व वेग देण्यासाठी, अधिग्रहीत खासगी रुग्णालयांमधील सुविधांच्या खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली.
जालना : राज्यात लॉकडाऊन आधी जनतेला पूर्व सूचना देणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आज अर्थमंत्री आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात बैठक झाली. त्यावेळी लॉकडाऊनमधील येणार्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. दरम्यान लॉकडाऊनची जनतेनं मानसिकता ठेवावी आणि लॉकडाऊन लावण्याआधी जनतेला पुरेसा वेळ आणि पूर्वसूचना देण्यात येईल अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात सेमी लॉकडाऊनची स्थिती आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. आज दिवसाला ६३ हजार रुग्ण आढळत आहेत, असं म्हणत आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे असंही ते म्हणाले. बेड्स, ऑक्सीजन पुरवठा याची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकार्यांना देण्यात आल्या असून, पुढचे निर्णय परिस्थितीचा आढावा घेऊन मंत्री एकत्र बसून निर्णय घेतील ही माहितीही त्यांनी दिली.
कोरोनाबाधितांचं आकडे वाढत चालले आहेत. मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. लवकरच याबाबत निर्णय झाला पाहिजे. काय मदत द्यायची याबाबत अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा करतील. ज्यांचं हातावर पोट आहे त्याच्यांसाठी काहीतरी करावं लागेल. लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तसं न केल्यास संसर्ग वाढत जाईल, असं राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन करणार असल्याचं कळतं. जर रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही तर लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या लॉकडाऊन दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. वेळीच लॉकडाऊन केलं नाही तर एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत रुग्णांचा आकडा 11 लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाउन दरम्यान कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे.
लाॅकडाऊनसाठी बैठकांमागे बैठकांचा सिलसिला सुरु ,
टास्क फोर्सच्या बैठकीनंतर पुन्हा एका बैठकीचं नियोजन ,
मुख्य सचिव सिताराम कुंटे, आरोग्य सचिव प्रदीप व्यास व इतर अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये होणार बैठक ,
थोड्याच वेळात 8.30 वाजता मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये होणार बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक संपली, या बैठकीनंतर राज्यातल्या सर्व आयएएस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री बातचीत करणार, लॉकडाऊन लावायचा झाला तर प्रत्येक विभागाची तयारी, पुढील गणितं आणि आर्थिक बाजूची माहिती घेणार, टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनची दहाकता किती ठेवायची? यावर चर्चा झाली. रुग्णसंख्या जिकडे जास्त असेल तिकडे कडक लॉकडाऊन गरजेचं, जास्त कडक लॉकडाऊन लावलं तर सामान्य जनतेचे हालही नाही झाले पाहिजे यावर चर्चा झाली. लॉकडाऊन करायचं तर किती दिवसाचं करायचं? राज्यातली आरोग्य यंत्रणा आणि कर्मचारी याचं नियोजन किती पटीनं आणि कसं वाढवले गेले पाहिजे? यावरही चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात उद्या सकाळी बैठक होण्याची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्यात लाॅकडाऊनसंदर्भात बैठक सुरु,
डॉक्टरांच्या 'टास्क फोर्स' मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे.
डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय ओक, हिंदुजा रुग्णालयाचे डॉ झहीर उडवाडिया , लिलावती रुग्णालयाचे डॉ . नागांवकर, वोक्हार्ट रुग्णालयाचे केदार तोरस्कर , फोर्टीस रुग्णालयाचे डॉ.राहुल पंडित,लोकमान्य टिळक रुग्णालयाचे शिव डॉ . एन.डी. कर्णिक , पी . ए .के. रुग्णालयाचे डॉ . झहिर विरानी , केईएम रुग्णालयाचे डॉ . प्रविण बांगर, कस्तुरबा रुग्णालयाचे डॉ . ओम श्रीवास्तव हे या टास्क फोर्स मध्ये आहेत.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करणं हाच पर्याय असल्याचं काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाऊन हा कमीत कमी 15 दिवसांचा असेल. लॉकडाऊनची सर्वांच्या मनाची तयारी झाली आहे. अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री घेतील, असं टोपे यांनी सांगितलं आहे.
अमरावती विभागातून फक्त यवतमाळला कोरोना लसीचे 12 हजार डोस मिळाले आहेत. दोन दिवस पुरेल एवढा लस साठा उपलब्ध झाला असून उद्या आणखी लस साठा मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी कोरोना प्रतिबंधित लस संपल्याने लसीकरण ठप्प झाले होते. आज अकोला येथून ही लस प्राप्त झाली आहे
कोरोनाची दुसरी लाट मुंबईसह राज्यावरही धडकली आणि पाहता पाहता नियंत्रणात असणारा हा संसर्ग हाताबाहेर गेला. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, की सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी नव्यानं कोविड सेंटरच्या उभारणीचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. ही सर्व परिस्थिती, रुग्णांसाठी बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजन पुरवठा याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला. ज्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ही लाट म्हणजे त्सुनामी असल्याचं म्हणत नागरिकांना सतर्क केलं.
लॉकडाऊन असतानाही कोरोना चाचणी केंद्रांवर नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागपूरात टेस्टिंग लॅब्सच्या समोर गर्दी. तासंतास लोक कोविड टेस्ट करायला रांगा लावून उभे आहेत.
Maharashtra Corona Lockdown : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि रोज वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. कारण आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनला पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. आज सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही.
राज्याला मदत व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, आरोग्य मंत्री राजेश टोपेंचं आवाहन, किमान मी तरी कोरोनाबद्दल राजकारण करत नाही, राजेश टोपेंचं फडणवीसांना उत्तर, पुणे मुंबई नागपूरमध्ये व्हेंटिलेटर वाढवण्याची गरज असल्याची टोपेंची माहिती
Maharashtra Lockdown : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे महत्त्वाचे, लॉकडाऊनबद्दलचा मधला मार्ग काढावा, मध्यबिंदू काढला पाहिजे, लॉकडाऊनबद्द्ल माध्यमांना फक्त दोन ते तीन लोकांनी माहिती द्यावी, जास्त लोक बोलत राहिले तर लोकांचं कन्फ्युजन होतं- अशोक चव्हाण
Maharashtra Full Lockdown : मंदिरावर अवलंबून असलेले, केशकर्तनालय यांच्या मदतीचा विचार व्हावा. पूर्ण नुकसान भरपाई नको पण ही लोकं जगली पाहिजे याचा विचार व्हावा- फडणवीस
लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी लोकांना दोन ते तीन दिवसाचा वेळ दिला पाहिजे. अचानकपणे लॉकडाऊन जाहीर करू नये- अशोक चव्हाण
Maharashtra Lockdown : एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन
आम्ही राजकारण बंद करतो पण तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, सहकार्य आम्ही करू पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या- देवेंद्र फडणवीस यांची मागणी
Maharashtra Lockdown : कडक लॉकडाऊनची गरज, नाहीतर 15 एप्रिलनंतर रुग्णांची स्थिती भीषण होईल : सीताराम कुंटे
मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु , मुख्यमंत्री ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, सीताराम कुंटे बैठकीला हजर
पार्श्वभूमी
Maharashtra Corona Lockdown LIVE Updates: महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि रोज वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. सतत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय घेऊ शकतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. दरम्यान राज्य सरकारने गेल्या आठवड्यात कडक निर्बंध जाहीर केले होते. ज्यात वीकेंड लॉकडाउन, रात्री कर्फ्यू आणि दिवसा जमावबंदी यांसारख्या आदेशांचा समावेश होता. पुढील आदेश येईपर्यंत गे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत सुरू राहतील.
टास्क फोर्सच्या बैठकीत काय झालं?
14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे, अशी माहिती टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्यमंत्रीच लॉकडाऊनची घोषणा करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या ऑनलाईन बैठकीत लॉकडाऊन लागू करण्यासह विविध विषयांवर चर्चा झाली.
...अन्यथा 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर : मुख्य सचिवांचा इशारा
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. शनिवारी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्वाचा इशारा दिला आहे. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा मुख्य सचिवांनी दिला. मुख्यमंत्र्यांसह सर्वांसमोर यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती संदर्भात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- लॉकडाऊनबाबत सुवर्णमध्य साधणारा निर्णय घ्या आणि 'राजकारण' न करण्याबाबत सहकाऱ्यांनाही समज द्या : देवेंद्र फडणवीस
- CM Uddhav Thackeray : राज्यात कडक लॉकडाऊन लागणारच? सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडलेले महत्वाचे दहा मुद्दे
- महाराष्ट्रासाठी येत्या तीन दिवसात 1121 व्हेंटिलेटर येणार : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -