Maharashtra Coronavirus live Update: लॉकडाऊन शिथिल झाल्याने लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग : पल्लवी सापळे

राज्यातील विविध भागातील शेकडो विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. वाशिम, सोलापूर, सातारा, लातूर अशा विविध भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Feb 2021 01:57 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Update : राज्यातील शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील विविध भागातील शेकडो विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. वाशिम, सोलापूर, सातारा,...More

पूर्ण राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे लहान मुलांना देखील कोरोनाची बाधा होत असल्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. आतापर्यंत सुमारे 74 हजार 459 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली असून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर हे प्रमाण वाढले असून मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी बस किंवा ऑटो रिक्षातून मुलांना शाळेत न पाठवता स्वतः सोडवावे, तसेच मुलांना मास्क बंधनकारक करण्यात यावे, ज्येष्ठांकडून लहान मुलांना संसर्ग झाला असून कुटुंबात लहान मुलांची काळजी घ्यावी, लहान मुलांमध्ये लक्षणे जाणवल्यास त्यांना घरीच ठेवावे असे आवाहन जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे यांनी एबीपी माझाशी बोलताना केले.