Maharashtra Corona Cases : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 44493 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29644 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 5070801 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.74% एवढे झाले आहे.
राज्यात आज 555 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.57% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 32441776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5527092 (17.4 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2794457 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 20946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 367121 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.