Maharashtra Lockdown: कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून विकेंड लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार? काय बंद?



काय सुरु, काय बंद 



  • डि मार्ट, बिग बाजार, रिलायन्स मॉल किंवा सुपरमार्केट सुरु राहणार का?
    एकाच ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतरही वस्तू विकल्या जात असतील तर अशी दुकाने, मॉल्स, सुपरमार्केट बंद राहतील.

  • लॉकडाऊनच्या काळात काय सुरु, काय बंद 
    अत्यावश्यक सेवा सर्व सुरु राहतील. मात्र, कोणालाही कारणाशिवाय प्रवास करता येणार नाही. 

  • विकेंड लॉकडाऊन दरम्यान बाजार समित्या सुरु राहणार का?
    हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था परिस्थिती पाहून निर्णय घेऊ शकतात. बाजारात जास्त गर्दी होत असल्याचे दिसल्यास ते बंद करु शकतील.

  • बांधकाम क्षेत्राला साहित्य पुरवणारे दुकाने चालू राहणार का?
    नाही

  • गॅरेज, ट्रान्सपोर्ट सेवा, अटोमोबाईल स्पेअर पार्ट विकणारी शॉप्स सुरु राहणार का?
    वाहतूक सुरु असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरु राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविडविषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायचे आहे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

  • केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडतात का?
    नाही. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. आवश्यक सेवेत समाविष्ट असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजले जातील.

  • दारू विक्रीची दुकाने उघडी राहणार का?
    नाही.

  • रस्त्याच्याकडेचे ढाबे उघडे राहणार का?
    हो. पण उपाहारगृहांप्रमाणेच बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेऊ शकतात.

  • इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का?
    नाही.

  • दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील?
    नाही.

  • आपले सरकार, सेतू केंद्रे सुरु राहू शकतील?
    हो. आठवड्याच्या दिवशी (विक डेज) सकाळी 7ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहू शकतात

  • आठवड्याच्या शेवटी रात्री ८ नंतर किंवा सकाळी ७ च्या आत उपाहारगृहे होम डिलिव्हरी करू शकतात का?
    आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपाहारगृहांतून सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (विकेंड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाही. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल.