मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज किंचिंत वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत जवळपास 90 रुग्णांची अधिक नोंद झाली आहे. आज नवे 452 कोरोनाबाधित आढळले असून काल (9 मार्च) 359 रुग्ण आढळले होते. आरोग्य विभागने दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 452 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 494 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याशिवाय 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  


राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के


राज्यात आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 19 हजार 594 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.09 टक्के आहे. सध्या राज्यात 22 हजार 225 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 599 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  


देशात 4 हजार 184 नवे कोरोनाबाधित


देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने कमी होत असल्याची दिलासादायक माहिती आहे. देशात गेल्या 24 तासांत 4184 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 104 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44,488 इतकी झाली आहे. काल 4 हजार 575 नवीन रुग्ण आणि 145 मृत्यूची नोंद झाली होती. म्हणजेच कालच्या तुलनेत आज रुग्ण संख्या कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44 हजार 488 इतकी कमी झाली आहे. तसेच कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 15 हजार 459 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 20 हजार 120 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. 


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha