मुंबई :   राज्यात आज  1931 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update)  नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1953 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे 14  रुग्ण तर बीए. 2.75  चे 35 रुग्ण आढळले आहेत. 


राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे 14  रुग्ण तर बीए. 2.75  चे 35 रुग्ण 


राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे 14  रुग्ण तर बीए. 2.75  चे 35 रुग्ण आढळले आहे.  यामुळे बीए. 5 व्हेरीयंटची रुग्णसंख्या 272 आणि बीए. 2.75 ची रुग्णसंख्या 234 वर गेली आहे. 


नऊ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात आज नऊ  कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,97,907 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 11875 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 11875 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 3036  इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 2591   सक्रिय रुग्ण आहेत. 


देशात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित, 49 रुग्णांचा मृत्यू (Corona Update) 


 देशात गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गुरुवाी 20 हजार 551 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 53 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रात 2024 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर 2190 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.