मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) दिवसेंदिवस वाढ होताना  दिसत आहे. बुधवारी राज्यात  188 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील हजारापार गेली आहे. राज्यात सध्या  1049 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 166 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज एका कोरोना रुग्णांचा मृत्यू


राज्यात आज  एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,29, 469 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 8,02,70, 696 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


राज्यात सध्या  1049 अॅक्टिव्ह रुग्ण 


राज्यात सध्या 1049 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 642 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात 223, ठाण्यात 100 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.


गेल्या 24 तासात देशात 3 हजार 205 नवीन कोरोना रुग्णांची नोंद


 देशात अद्यापही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 3 हजार 205 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 19 हजार 509 आहे. देशात हळूहळू कोरोना रुग्णांचा धोका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कालच्यापेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल देशात 2 हजार 568 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 20 जणांचा मृत्यू झाला होता. आत्तापर्यंत देशात कोरोना रुग्णांची संख्या 4 कोटी 30 लाख 88 हजार 118 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत देशभरात कोरोनामुळे 5 लाख 23 हजार 920 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.