मुंबई : भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा वापर  राजकारणासाठीच केला अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.  तर मनसेचे भोंगे मनसेवरच
उलटणार असा इशाराही राऊतांनी दिला आहे. संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. 


मुंबई : राज ठाकरेंचा वापर राजकरणासाठी केला गेला आहे. त्यांचे भोंगे त्यांच्यावरच उलटत आहेत निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत.आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. भाजपनं पुन्हा एक राज ठाकरेंचा बळी दिला आहे, अस वक्तव्य शिवसेन खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर राज ठाकरेंचा हा विषय सामाजिक नाही हा धार्मिकच असल्याचे देखील राऊत यावेळी म्हणाले. 


संजय राऊत यांनी यावेळी हिंदूना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरेंच्या या निर्णयानं हिंदू नाराज झाले आहेत हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम सुरु झालं आहे हिंदूमध्ये संताप आहे पण हिंदूनी आता संयम बाळगला पाहिजे असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.


संजय राऊत म्हणले, राज ठाकरेंविरोधात सीएमओ कार्यालयात तक्रारी आल्या आहेत. हिंदूसाठी आणि श्रद्धाळूसाठी आजचा दिवस काळा मानला जातो. आज सकाळपासून महाराष्ट्रातील तीर्थस्थानंवरची काकड आरती बंद झाली आहे. शिर्डी, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या आरत्या बंद झाल्या आहेत. भोंग्यांच्या निमित्ताने सर्व मंदिरांवरचे भोंगे बंद झाले आहेत.


जो पर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे नियम मोडून अजान सुरु झाली तर हनुमान चालिसा वाजवणारच... अशा शब्दात राज ठाकरेंनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. भोंग्यांचं आंदोलन हे एक दिवसाचं नसून 365 दिवस चालणारं आंदोलन आहे असं मनसे प्रमुख म्हणाले. राज ठाकरेंनी काल पत्रक काढून मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात आंदोलन सुरु करण्याचं आवाहन केलं होतं. राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांकडून त्यांची धरपकडही करण्यात आली.  मात्र नियम मोडणाऱ्या मशिदींवर कारवाई करण्याऐवजी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई का होतेय असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.