मुंबई : राज्यातील  कोरोनाचा (Maharashtra Corona Cases) प्रादुर्भाव  आटोक्यात येत असून  राज्यातील  रुग्णसंख्या कमी होताना  दिसून येत आहे.    गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  467 नव्या रुग्णांची भर पडली आहे.  राज्यात आज  12 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1 हजार 144 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


राज्यात आज 234 ओमायक्रॉनबाधितांची नोंद 


राज्यात आज 234 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 4733 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 4509 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 202 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत


राज्यात आज  12  कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज 12  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख  14 हजार 719  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.06 टक्के आहे.  सध्या राज्यात  42, 118 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 602  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 80 लाख 65  हजार 969 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


 मुंबई आज  80 नवे कोरोनाबाधित


 मुंबईतील (Mumbai) आज  80 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या किंचीत कमी झाली असून काल 100 नवे रुग्ण आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 80 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 118 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha