मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची आकडेवारी (Maharashtra Corona Update) स्थिर असल्याचं चित्र आहे. राज्यात आज 1846 नव्या रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्णांना आपला जीव (Maharashtra Corona Death) गमवावा लागला आहे. राज्यात आज एकूण 2240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


राज्यात 11,871 सक्रिय रुग्णसंख्या (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात आज 11,827 इतक्या सक्रिय रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबई शहरात असून ती 5392 इतकी आहे. मुंबई खालोखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही 2368 इतकी आहे. 


राज्यात आजपर्यंत एकूण 79,33,033 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.02 इतकं झालं आहे. तर राज्यात आज चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यू दर हा 1.83 इतका झाला आहे. 


देशातील स्थिती


देशातील कोरोना संसर्गामध्ये चढ-उतार कायम आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या किंचित कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आदल्या दिवशी म्हणजे दिवसभरात 10 हजार 725 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. कोरोना रुग्ण संख्येत 469 रुग्णांची घट झाली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 13 हजारहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 13 हजार 528 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त असणे ही दिलासादायक बाब आहे.


देशात गुरुवारी दिवसभरात 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत देशात 5 लाख 27 हजार 556 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन आकडेवारी जारी केली आहे. देशात सध्या 90 हजार 707 सक्रिय रुग्ण आहेत. गुरुवारी दिवसभरात देशात 13 हजार 528 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशात एकूण 4 कोटी 37 लाख 70 हजार 913 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.