Maharashtra Corona Update : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील कोरोना रूग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज फक्त 180 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. कालच्या तुलनेत आज नोंद झालेल्या रूग्णांची संख्या देखील खूपच कमी आहे. काल राज्यात 379 रूग्णांची नोंद झाली होती. शिवाय आज 357 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत होता. परंतु, मागील एक आठवड्यापासून पुन्हा नव्या रूग्णांच्या संख्येत घट सुरू झाली. ही घट कायम राहत आज नव्या रूग्णांची संख्या 200 च्या खाली आली. गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोरोनाचा सामना करत असताना ही आकडेवारी खूपच दिलासादयक आहे. 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 357 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,71,346  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98. 14 टक्के एवढे झाले आहे.

Continues below advertisement

एकही मृत्यू नाही (Maharashtra Corona Death)  

रूग्ण संख्या कमी होण्यासह आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज एकाही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 82 टक्के एवढा आहे.

सक्रिय रूग्ण (Maharashtra Corona Update)  राज्यातील रूग्ण संख्या घटत आहे. त्याचबरोबर सक्रिय रूग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या तीन हजारांच्या खाली आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या 2739 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात सध्या 826 करोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. तर पुण्यापाठोपाठ मुंबईत 714 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. 

देशातील स्थिती  (India Corona Update) 

राज्यासह देशातील कोरोना रूग्णांमध्ये देखील मोठी घट झाली आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये देशात 3011 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग कायम आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये 364 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे. पण आज 10 कोरोनाबळींची संख्या वाढली आहे. काल 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज ही संख्या 28 वर पोहोचली आहे.