मुंबई : राज्यात जून  महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे.  रविवारी राज्यात तब्बल 2946 रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 1803 रुग्ण हे मुंबईतील आहे आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब  आहे.


मुंबईकरांची चिंता वाढली


आज राज्यात 2946 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 1432  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 1803  रुग्णांची नोंद झाली आहे.  राज्यात आज कोरोनाच्या दोन  मृत्यूची नोंद झाली आहे. 


आज एका कोरोना मृत्यूची नोंद


राज्यात आज एकूण 1432 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,46, 337  जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.92 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला आहे. 


सक्रिय रुग्णसंख्या वाढली


राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 16370 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 10889 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 2805 इतके सक्रिय रुग्ण आहेत. 


देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच


देशातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत असताना गेले काही दिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची धोक्याचा अंदाज वर्तवला आहे. देशात शनिवारी दिवसभरात 4 हजार 435 रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे. सध्या एकूण 44 हजार 513 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात नवी माहिती जारी केली आहे. देशात आतापर्यंत पाच लाख 24 हजार 761 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.