मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज 171 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 394 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज तीन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,22, 754 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 88, 85, 405 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 1680 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 1680 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 317 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 168 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशातील स्थिती
देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसागणिक कमी होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 528 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 149 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दिवसभरात 3 हजार 997 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकुण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 29 हजार 181 वर पोहोचली आहे. देशातील कोरोना रुग्ण सकारात्मक दर 0.40 इतका झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 5,16,281 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, देशात गेल्या 24 तासांत 3997 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 4 कोटी 24 लाख 58 हजार 543 रुग्ण बरे झाले आहेत.
संबंधित बातम्या:
- Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी 48 कोरोनाबाधितांची नोंद, एकही मृत्यू नाही
- China Corona : चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, चीनमध्ये शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी अडचणीत
- Coronavirus : चीन आणि युरोपीय देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर, केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून सूचना