Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या  (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या  एक हजाराखाली आली आहे. राज्यात सध्या  926 सक्रीय रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी 140 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  राज्यात आजपर्यंत एकूण 77,24,803 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11% एवढे झाले आहे. रविवारी राज्यात फक्त एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.   सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे.  


मुंबई, पुण्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण -
राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 926 इतकी आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई आणि पुणे या शहरात आहेत. मुंबईत 268 सक्रीय रुग्ण आहेत. तर मुंबईत 228 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाणे 162 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. हिंगोली आणि यवतमाळमध्ये सध्या एकही सक्रीय रुग्ण नाही. या दोन्ही जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु आहे.  रत्नागिरी, जालना, वाशिम आणि गोंदियामध्ये प्रत्येकी फक्त एक सक्रीय रुग्ण आहे. इतर ठिकाणीही सक्रीय रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे.


रविवारी कुठे आढळले सर्वाधिक रुग्ण -
रविवारी राज्यात 140 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,73,509  झाली आहे. राज्यात आढळलेल्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या मुंबईमध्ये सर्वाधिक आहे. रविवारी सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत रविवारी 43 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईनंतर पुणे मनपामध्ये 20, पिंपरी चिंचवड मनपा 14, अहमदनगर 12 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. याशिवाय इतर ठिकाणी नव्या कोरोना रुग्णांची संख्या दहाच्या आत आहे. चंग्रपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, जालना, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, या जिल्ह्यात रविवारी एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.