Maharashtra CM Uddhav Thackeray Speech LIVE: मुख्यमंत्री ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार, राज्यात लॉकडाऊन?

Maharashtra CM address today : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Apr 2021 08:08 PM
Maharashtra CM Uddhav Thackeray Speech सरकार खंबीर आहे

महाराष्ट्र राज्य सरकार हे खंबीर आहे. आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू देणार नाही. सर्वांच्या सहकार्याचीच मी अपेक्षा करतो. सणांवरही निर्बंध आणावे लागतील. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी देत राज्यात कठोर निर्बंध लागणार असा इशारा दिला आहे. 

Maharashtra CM Uddhav Thackeray Speech पहिल्या दिवशीपासूनचे नियम आजही कायम

पहिल्या दिवसाचीच परिस्थिती कायम आहे, पण आपण मधल्या काळात गाफील झालो. आता कोरोनाशी लढताना आपण परिस्थितीत पाय घट्ट रोवून उभे राहुया. विरोधकांना विनंती करतो, की जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण मी इशारा देत आहे. दृश्य स्वरुपातीव परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय लवकरच घेणार. - मुख्यमंत्री

Maharashtra CM Uddhav Thackeray Speech राज्यातील जनतेवर माझा विश्वास

राज्यातील जनतेवर माझा विश्वास आहे, तुम्हीय या युद्धातचे सैनिक आहात. अनावश्यक कारणामुळे बाहेर पडू नका. जिद्दीने परिस्थितीला सामोरं गेलात तर चित्र वेगळं असेल. पण, सद्यस्थिती कायम राहिली तर 15, 20 दिवसांत रुग्णालयं तुडूंब भरतील. स्वयंशिस्तीनेच कोरोनाला हरवणं शक्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Maharashtra CM Uddhav Thackeray Speech परिस्थिती हाताबाहेर गेली तर....

परिस्थिती हाताबाहेर गेली तर, ब्राझीलसारखं चित्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. रोजगार परत मिळेल. पण, गेलेला जीव परत मिळणार नाही. मला वेगळा उपाय हवा. लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य असलं तरी संसर्गाची साखळी तोडायची कशी, मुख्यमंत्र्यांचा सवाल 

Maharashtra CM Uddhav Thackeray Speech येत्या काही दिवसांत कडक निर्बंध

येत्या एक-दोन दिवसांच कडक निर्बंध लागू करणार. कार्यालयांनाही सुचनावली दिलीच आहे.- मुख्यमंत्री 

Maharashtra CM Uddhav Thackeray रस्त्यावर उतरा, पण....

लॉकडाऊन झालं, तर रस्त्यावर उतरा असं सांगणाऱ्या अनेकांनाच मी सांगतो की गरजूंची मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा, आरोग्य सेवकांना मदतीचा हात देण्यासाठी रस्त्यावर उतरा. कोरोनाविरोधातच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतराच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन 

Maharashtra CM विरोधकांवर नाव न घेता तोफ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना, लॉकडाऊन परिस्थितीच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधणाऱ्या पक्षांना, आरोग्य सुविधा वाढवण्याचा सल्ला देणाऱ्याउद्योगपतींनाही वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना नाव न घेता फैलावरही धरलं. 

Maharashtra CM Uddhav Thackeray Speech आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोरोनास्थिती

मुख्यमंत्र्यांनी परदेशातील अनेक राष्ट्रांची नावं घेत आकडेवारीसह येथील कोरोनापरिस्थिती आणि तिथं लागू करण्यात आलेले नियम सर्वांसमक्ष ठेवले. 

Maharashtra CM राज्यात एका दिवसात 3 लाख नागरिकांना लसीकरण

आतापर्यंत 65 लाख नागरिकांना लसीकरण केलं असून, एका दिवसाला 3 लाख नागरिकांना लस दिली आहे. ही संख्या 6-7 लाखांवर नेण्याचं लक्ष्य आहे. लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना होणार नाही असं नाही, फक्त त्याच्या धोक्याचं प्रमाण हे कमी झालेलं असेल. लस घेणं, चाचण्या वाढवणं हा अद्यापही उपाय नाही. चाचण्यांमुळे रुग्णसंख्या कळत आहे. रुग्णवाढ थांबवण्यासाठीचा उपाय मात्र अजूनही नाही. - मुख्यमंत्री 

सुविधा कमी पडतील तिथे सुविधा वाढवा..

आरोग्यविषय सुविधा वाढतील. पण, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांची वाढीव संख्या कुठून आणायची. यांच्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झालेली होती. अनेकजण यातून सावरले पण, त्यांच्यावर याचे परिणाम मात्र अद्यापही दिसत आहेत. या यंत्रणेतही हाडामांसाची माणसंच आहेत. यंत्रणा आपल्यासाठीच राबत आहे. न थकता चाचण्यांमध्ये हातभार लावत आहेत. आता या आरोग्य सेवकांना आराम द्यायचीही गरज आहे...

कोरोना वेगाने पसरतोय

कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग सर्वांपुढे ठेवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि त्या तुलनेत राज्यात असणाऱ्या आरोग्य सुविधांची आकडेवारी सर्वांपुढे मांडली 

मी जबाबदार...

मला व्हिलन ठरवलं तरीही मी मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी पार पाडेनच- मुख्यमंत्री 

चाचण्यांची संख्या वाढवणार

आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्यावर भर. दिवसाचा अडीच लाथ चाचण्या करण्यावर राज्य सरकार भर देणार. 70 टक्के चाचण्या आरटीपीसीआर असणार. कुठेही तडजोड करणार नाही. आपण काहीही लपवत नाही आणि लपवणारही नाही. राज्यातील परिस्थिती धक्कादायक वाटत असली तरीही आपण सत्य परिस्थितीच सर्वांसमोर आणणार आहोत. 

पार्श्वभूमी

Maharashtra CM address today : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होणार की कठोर निर्बंध लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


राज्यात लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन
राज्यात लॉकडाऊन करण्यावरून मतभेद पहायला मिळत असून अनेकांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन करणे हे राज्याच्या हिताचे नसून, राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह 'मिनी लॉकडाऊन' चा विचार सध्या सुरू आहे.


असा असू शकतो मिनी लॉकडाऊन



  • सध्या राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीची वेळ वाढवून संध्याकाळी 7 ते सकाळी 8 पर्यंत करण्याचा विचार आहे. या वेळेतच दुकाने, हॉटेल, बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

  • एकाच परिसरातील / विभागातील दुकाने दिवसाआड सुरू ठेवण्याचा विचार. एका गल्लीत एका रांगेतील सर्व दुकाने एका दिवशी सुरू राहतील तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रांगेतील सुरू असतील.

  • सर्वात जास्त फूट फॉल म्हणजेच गर्दीची ठिकाणे जसे मॉल, थिएटर्स, धार्मिक स्थळे, प्ले ग्राऊंडस, गार्डन्स आणि पिकनिक पॉईंट्सवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता आहे. संकर्मनाचे केंद्र असलेल्या या ठिकाणांवर प्रशासन कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.