मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1410 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 868 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णाचा स्फोट होईल, असेही सांगितले जातेय. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 1 हजार 243 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.69 टक्के आहे.
राज्यात आज 20 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 20 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 108 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 54 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 8 हजार 426 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 86 हजार 815 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 886 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 82 , 35, 476 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
देशात 24 तासांत कोरोनाचे 6 हजार 650 नवे रुग्ण
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus Update) प्रादुर्भाव सुरुच आहे. त्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं देशात शिरकाव केल्यानं चिंता वाढली आहे. दिवसागणिक देशात ओमायक्रॉनबाधितांचा आकडाही वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 6 हजार 650 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 360 रुग्ण आढळून आले आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 77 हजार 516 इतकी आहे. या महामारीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 79 हजार 133 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (गुरुवारी) देशात 7 हजार 51 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 15 हजार 977 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय, रात्रीची संचारबंदी लावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यांना आदेश
- ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी
- Omicron : राज्यात ओमायक्रॉन रुग्णांच्या आकडेवारीत उच्चांकी वाढ, 23 नव्या ओमायक्रॉनबाधितांची नोंद