मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 792 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 98 हजार 807 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.
राज्यात आज 11 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 11 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 65 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 34 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 14 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7 हजार 111 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 73 हजार 053 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 864 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 78 , 83, 061 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
गेल्या 24 तासात देशभरात 5 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तसात देशभरात 5 हजार 326 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 453 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबरोबरच ओमायक्रॉनचा धोका देखील वाढतोय. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 200 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांची चिंता वाढलीय. कोरोनाचे संकट आल्यापासून देशात आतापर्यंत एकूण 3 कोटी 47 लाख 52 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तब्बल 4 लाख 78 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 71 हजार लोक बरे झाले आहेत. देशात सध्या कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ही 1 लाखांपेक्षा कमी आहे. सध्या 79 हजार 97 लोक हे कोरानाग्रस्त असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या: