मुंबई : राज्यात आज 7 हजार 302 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 7 हजार 756 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 16 हजार 506 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.34 टक्के आहे.
राज्यात आज 120 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे. तब्बल 35 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 94 हजार 168 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना, हिंगोली, यवतमाळ, गोंदिया या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जालन्यात 42, हिंगोलीत 50, यवतमाळमध्ये 18, गोंदियामध्ये सध्या 55 अॅक्टिव रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 869 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
धुळे, नंदूरबार आणि वर्धा या तीन जिह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तर कोल्हापुरात सर्वाधिक 947 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,62,64,259 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,45,057 (13.5 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,51,872 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,743 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 392 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 392 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 502 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,08,716 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5,897 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1152 दिवसांवर गेला आहे.