मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1 हजार 736 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 033 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 04 हजार 320 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. 


दरम्यान, राज्यात आज 36 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे..  राज्यात सध्या कोरोनाचे 32 हजार 115 सक्रीय रुग्ण आहेत. 


पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 465  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (11), नंदूरबार (5),  धुळे (7), जालना (65), परभणी (90), हिंगोली (19), नांदेड (12),  अकोला (04), वाशिम (03), बुलढाणा (06), नागपूर (71), यवतमाळ (04),  वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3), गडचिरोली (14) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


देशात 24 तासांत 18 हजार 132 रुग्णांची नोंद, तर 193 रुग्णांचा मृत्यू


 देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावात आता घट होताना पाहायला मिळत आहे. देशात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा मंदावल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 18 हजार 132 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. अशातच 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल (रविवारी) देशात 18 हजार 166 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जाणून घेऊया देशातील कोरोनाबाधितांची सध्याची स्थिती. आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी आकडेवारीनुसार, देशांत गेल्या 24 तासांत 21 हजार 563 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होऊन 2 लाख 27 हजार 347 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 32 लाख 93 हजार 478 रुग्णांनी कोरोनाला मात दिली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 50 हजार 782 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.