मुंबई : गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत राज्याला आज काहीसा दिलासा मिळाला असून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसून येतंय. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 31 हजार 111 नव्या रुग्णांची भर झाली असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 29, 092 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या आधी रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर असायची, त्यात आता घट होत असल्याचं दिसून येतंय.
राज्यात 112 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 112 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1860 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 959 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 24 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.95 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 68 लाख 29 हजार 992 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.3 टक्के आहे. सध्या राज्यात 22 लाख 64 हजार 217 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2994 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,21,24,824 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईतील रुग्णसंख्येत घट, 5 हजार 956 नवे कोरोनाबाधित
मागील 24 तासांत 5 हजार 556 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. तर नव्या बाधितांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात नागरिक कोरोनामुक्त झाले असून एकूण 15 हजार 551 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 5 हजार 556 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 469 झाली आहे. तर 15 हजार 551 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे आतापर्यंत 9 लाख 35 हजार 934 मुंबईकरांनी कोरोनावर मात झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 93 टक्क्यांवर पोहचला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus New Cases : कोरोनाचा वाढता धोका! गेल्या 24 तासात 2 लाख 58 हजार नवे रुग्ण, 385 मृत्यू
- देशात कुणावरही कोरोना लसीची सक्ती नाही, केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
- आधी कोरोना.. मग डेल्टा, आता ओमायक्रॉन; आणखी गंभीर रुपं घेणार कोरोना, तज्ज्ञांचा दावा