मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2 हजार 446 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 486 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 99 हजार 464 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. 


दरम्यान, राज्यात आज 44 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. हिंगोली, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, या पाच जिल्ह्यांमध्ये आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.  राज्यात सध्या कोरोनाचे 33 हजार 6 सक्रीय रुग्ण आहेत. 


पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 422  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (16), नंदूरबार (5),  धुळे (8), जालना (60), परभणी (89), हिंगोली (19), नांदेड (08),  अकोला (26), वाशिम (05), बुलढाणा (09), नागपूर (82), यवतमाळ (06),  वर्धा (3), भंडारा (1), गोंदिया (3), गडचिरोली (14) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


मुंबईत आज 523 नवीन रुग्णांची नोंद


मुंबईत मागील 24 तासांत 523 नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 498 रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. परिणामी बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 72 लाख 36 हजार 606 इतकी झाली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर 97% झालाय. गेल्या 24 तासात 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या शहरात 5 हजार 38 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. दुप्पटीचा दर आता 1091 दिवसांवर गेला आहे.


देशात गेल्या 24 तासात देशात 19,740 कोरोना रुग्णांची नोंद


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 19 हजार 740 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्या आधी गुरुवारी देशात 21 हजार 257 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 271 रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशातील सक्रिय रुग्णसंख्याही घसरली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णसंख्या ही दोन लाख 36 हजार 643 इतकी आहे. गेल्या सात महिन्यातील ही सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या असून एकूण रुग्णसंख्येचा विचार करता त्याचे प्रमाण हे 0.70 टक्के इतकं आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत कोरोना लसीचे जवळपास 94 कोटी डोस देण्यात आले आहेत. तसेच सध्या 8.51 कोटी डोस शिल्लक आहेत.