मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1701 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 781 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 66 लाख 01 हजार 551 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के आहे.
राज्यात आज 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 7059 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (16), नंदूरबार (0), धुळे (5), जालना (54), लातूर (67) परभणी (27), हिंगोली (24), नांदेड (15), अकोला (23), अमरावती (14), वाशिम (04), बुलढाणा (08), नागपूर (79), यवतमाळ (06), वर्धा (5), भंडारा (3), गोंदिया (3), गडचिरोली (6 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 24 हजार 022 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,95,063 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 926 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 17, 62 ,963 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 465 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 465 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 562 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,30,183 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4356 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1395 दिवसांवर गेला आहे.
देशात गेल्या 24 तासात 666 जणांचा मृत्यू
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित (Covid-19) रुग्णांच्या घट होताना दिसत आहे. परंतु, कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 16 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 666 जणांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती उपयोगी ठरणार आहे. देशात गेल्या 24 तासात 16 हजार 326 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 666 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 53 हजार 708 वर पोहचली आहे. चिंताजनक बाब म्हणजे, देशात कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांपैकी 563 मृत्यू केरळ राज्यातील आहेत.